सावधान! हार्ट अटॅक हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देतं हे 6 संकेत

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे, यात माणसाचा जीवही जाऊ शकतो

धोका

हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्याने हृदयविकाराचा झटका येतो

हृदयविकाराचा झटका

मात्र याआधी आपले शरीर आपल्याला काही संकेत देतं असतं ज्याकडे वेळीच लक्ष दिल्यास हा धोका टाळता येऊ शकतो

संकेत

छातीत मध्यभागी वेदना, जळजळ, दाब किंवा जडपणा अशा समस्या जाणवत असतील तर सावध व्हा

छातीत दुखणे

कोणतेही जड काम न करता अशक्तपणा जाणवत असेल तर हे हृदयाच्या कमकुवतपणाचे लक्षण असू शकते

अशक्तपणा जाणवणे

कोणतेही काम न करताही श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते

श्वास लागणे

हृदयाला रक्तपुरवठा योग्य प्रकारे झाला नाही की घाम येतो, असे सतत होत असल्यास रुग्णालय गाठा

घाम येणे

जर वारंवार खंडित होत असेल किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका

झोप न लागणे

विनाकारण जर चक्कर येत असेल किंवा डोळ्यांसमोर अंधारी येत असेल तर हे हृदय कमकुवत होण्याचे लक्षण असू शकते

चक्कर येणे

ही सामान्य माहिती असून  यात कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

टीप