प्रवासाला निघण्यापूर्वी हवामान विभागाचा 'ऑरेंज' किंवा 'रेड' अलर्ट तपासूनच पुढचे पाऊल टाका.
Picture Credit: Pinterest
रस्ते बंद होण्याची शक्यता गृहीत धरून प्रवासाच्या नियोजनात नेहमी २-३ अतिरिक्त दिवस हाताशी ठेवा.
दुपारनंतर पाऊस आणि धुक्याचे प्रमाण वाढत असल्याने शक्यतो सकाळी लवकर प्रवासाला सुरुवात करा.
कमी दृश्यमानता आणि निसरड्या रस्त्यांमुळे डोंगराळ भागात सूर्यास्तानंतर प्रवास करणे पूर्णपणे टाळा. –
सोबत दर्जेदार रेनकोट, वॉटरप्रूफ जॅकेट आणि छत्री ठेवणे पावसाळी प्रवासासाठी अनिवार्य आहे.
केदारनाथ-यमुनोत्री ट्रेकसाठी उत्तम ग्रीप असलेले ट्रेकिंग शूज वापरा, जेणेकरून घसरण्याचा धोका कमी होईल.
चढाई करताना त्रास होऊ नये म्हणून फक्त अत्यावश्यक वस्तूंसह हलके सामान सोबत बाळगा.
उंचीवरील कमी ऑक्सिजन व थंडीचा विचार करून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रवास करावा.
स्थानिक प्रशासनाचे हेल्पलाईन नंबर आणि औषधांचा प्रथमोपचार किट नेहमी सोबत ठेवा.
दिल्ली ते तुंगनाथ गर्दी टाळून 'असा' करा अविस्मरणीय ट्रेक