भारताची अतिशय आलिशान रेल्वे 'गोल्डन चॅरियट' पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.
Picture Credit: Pinterest
या ट्रेनमध्ये प्रवाशांना जुन्या काळातील राजे-महाराजांसारखी भव्य जीवनशैली आणि आधुनिक सुविधा अनुभवता येतील.
ट्रेनचे डबे आलिशान अंतर्गत सजावट, स्मार्ट टीव्ही आणि हाय-स्पीड वाय-फाय स्ट्रीमिंगने सुसज्ज आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि आधुनिक फायर अलार्म सिस्टीम बसवली आहे.
ट्रेनमधील 'रुची' आणि 'नालापाक' या दोन रेस्टॉरंट्समध्ये स्वादिष्ट भारतीय व विदेशी खाद्यपदार्थ मिळतील.
प्रवासादरम्यान विश्रांतीसाठी ट्रेनमध्ये 'मडेरा लाउंज बार' आणि आयुर्वेदिक 'वेलनेस स्पा' देखील उपलब्ध आहे.
हे पहिले विशेष पॅकेज तुम्हाला बंगळूरुपासून थेट गोव्याच्या सुंदर किनाऱ्यांपर्यंत घेऊन जाईल.
इतर पॅकेजेसमध्ये 'ज्वेल्स ऑफ द साउथ' (६ दिवस) आणि हंपीसाठी 'ग्लिम्पसेस ऑफ कर्नाटक' (४ दिवस) समाविष्ट आहेत.
निवडक प्रवासावर २०% सूट आणि ३० जून २०२६ पूर्वी बुकिंग केल्यास ५% अतिरिक्त अर्ली बर्ड सवलत मिळेल.
‘रुपयांचा राजा’ बनवणारा देश; 1 लाखात मिळेल लक्झरी लाईफ