Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ
Ganesh Festival 2026: गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झालेले चाकरमानी आता मुंबईकडे परतू लागले आहेत. मात्र रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल आणि एसटी बसचे आरक्षण मिळणे कठीण झाल्याने परतीचा प्रवास खडतर ठरत आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त एसटी बसेस आणि विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.