भारताचा पाकिस्तानवर विजय (फोटो- ट्विटर)
आशियाई खेळ २०२६ मधील टेबल टेनिसच्या लढतीत भारतीय महिला संघाने आपली उत्तम घोडदौड कायम ठेवली आहे. या स्पर्धेत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३-० असा पुरता पराभव केला आहे. एकतर्फी ठरलेल्या या सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघाला सावरण्याची कोणतीही संधी दिली नाही. पाकिस्तानचा मोठा पराभव झाला आहे.
Asian games 2026: गड्यांनो लयं भारी! कबड्डीत भारताचा जपानवर ४९-२३ असा दणदणीत विजय
सुतीर्था मुखर्जीने आपल्या आक्रमक सर्व्हिस आणि नियंत्रित खेळाच्या जोरावर पाकिस्तानी खेळाडूचा ३-० अशा थेट सेट्समध्ये पराभव करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सिंड्रेला दासने अत्यंत प्रभावी खेळ करत प्रतिस्पर्धी खेळाडूला मॅटवर अजिबात टिकू दिले नाही. तिनेही ३-० अशी सरळ सेट्समध्ये मात करत भारताची आघाडी २-० ने भक्कम केली. श्रीजा अकुलाने आपल्या जागतिक दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन करत पाकिस्तानच्या खेळाडूचा ३-० असा एकतर्फी पराभव केला आणि भारताच्या ३-० अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.
🇮🇳 INDIAN WOMEN TEAM THRASH PAK 🇵🇰 3-0 IN TABLE TENNIS CLASH AT ASIAN GAMES! ✅ Sutirtha Mukherjee 3-0
✅ Syndrela Das 3-0
✅ Sreeja Akula 3-0 Our Girls didn’t event loose a single set, totally dominated everywhere! 💪 WELL DONE GIRLS! 🔥🔥🔥 https://t.co/gRJ21SxyFy pic.twitter.com/eUhJrbFKsx — The Khel India (@TheKhelIndia) September 21, 2026
भारतीय महिलांनी संपूर्ण सामन्यात पाकिस्तानला एक देखील गेम जिंकून दिला नाही. यामध्ये भारताने पाकिस्तानची धांदल उडवून दिली. त्यानंतर भारताने या गेममध्ये ३-० अशा क्लीन स्विपसह दणदणीत विजय नोंदवला. या शानदार कामगिरीमुळे टेबल टेनिसच्या पुढील फेऱ्यांमध्ये भारतीय संघाचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे. तर पाकिस्तानच्या संघाला या स्पर्धेत टिकून ठेवण्यासाठी विजय आवश्यक असणार आहे.






