Air Pollution Mumbai : फटाक्यांच्या बॉक्सवरील माहितीच संशयास्पद! QR कोड बनावट, बंदी असलेल्या बेरियमचा वापर; आवाज फाउंडेशनचा इशारा
Air Pollution Mumbai: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या बॉक्सवरील माहिती आणि QR कोडच्या विश्वासार्हतेवर आवाज फाउंडेशनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही फटाक्यांमध्ये बंदी असलेल्या बेरियमचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करत संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.