आधार हाऊसिंग फायनान्सचा नफा 308 कोटींवर ( सौजन्य - सोशल मीडिया )
गतवर्षीच्या सहामाहीतील 27 हजार 554 कोटी रुपयांच्या तुलनेत कंपनीची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयुएम) 18 टक्क्यांनी वाढून 32 हजार 643 कोटी रुपयांवर गेली आहे. याच कालावधीत कर्ज वितरणाचे प्रमाण 4 हजार 89 कोटी रुपयांच्या तुलनेत 4 हजार 613 कोटी रुपयांवर गेले आहे.
कंपनीला सप्टेंबर तिमाहीत 308 कोटी रुपयांचा तर सहामाहीत 591 कोटी रुपयांचा नफा झाला. नफ्यातील ही वाढ क्रमश: 16 आणि 17 टक्के इतकी आहे. सहामाहीत नक्त मालमत्ता वाढून 6894 कोटी रुपयांच्या तुलनेत 8201 कोटी रुपयांवर गेली आहे. मालमत्तेवरील परतावा 4.2 टक्क्यांवर स्थिर राहिला असून भाग भांडवलावरील परतावा 15 टक्के इतका असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
ढोबळ अनुत्पादक मालमत्तेचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण 1.42 टक्क्यांच्या तुलनेत घटून 1.34 टक्के इतके झाले आहे. कंपनीची समाधानकारक कामगिरी पाहून इंडिया रेटिंग आणि इक्रा या पतमापन संस्थांनी दीर्घकाळचे क्रेडिट रेटिंग वाढवत एए प्लस (स्थिर) असे केले आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीने जम्मू येथील शाखेची सुरुवात केली. या विस्तारानंतर 23 राज्यांतील शाखांची संख्या 632 वर पोहोचली आहे. आधार हाऊसिंग ही द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांसह निमशहरी भागात गृहवित्त पुरवठा करणारी आघाडीची कंपनी आहे.
Ans: कंपनीच्या सप्टेंबर तिमाहीतील कर्ज वितरणात २२ टक्क्यांची वाढ झाली असून, व्यवस्थापनाखालील मालमत्ता १८ टक्क्यांनी वाढून ३२,६४३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
Ans: कंपनीला सप्टेंबर तिमाहीत ३०८ कोटी रुपयांचा (१६% वाढ) तर सहामाहीत ५९१ कोटी रुपयांचा (१७% वाढ) नफा झाला आहे.
Ans: कंपनीची उत्तम कामगिरी पाहून इंडिया रेटिंग आणि इक्रा या संस्थांनी दीर्घकाळचे क्रेडिट रेटिंग वाढवून 'एए प्लस (स्थिर)' केले आहे, तसेच जम्मू शाखेच्या शुभारंभासह कंपनीच्या एकूण शाखांची संख्या ६३२ वर पोहोचली आहे.






