नाशिकच्या राजीवनगरमध्ये रात्रीच्या अंधारात दुचाकीस्वाराला रस्त्यावरील खड्डा दिसलाच नाही आणि दुचाकी थेट खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात ६१ वर्षीय प्रकाश वंडेशकर यांचा मृत्यू झाला. आता या घटनेनंतर रस्त्याच्या कामातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मोठ्या भावासोबत पोहण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय खुशबूचा आनंद काही क्षणांतच शोकांत ठरला. शिवापूरच्या वीटभट्टीजवळील शेततळ्यात पोहताना ती अचानक पाण्यात बुडाली. नागरिकांनी शोध घेऊन तिला बाहेर काढले, मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पहाटे २.३० वाजता मित्राला आलेला तो मेसेज अखेरचा ठरला... काही तासांतच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्रकृती अचानक खालावली. गोव्यातील निवासस्थानी त्यांना वाचवण्यासाठी तब्बल ४५ मिनिटे CPR देण्यात आला. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
वडिलांची हत्या करून आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी ‘दृश्यम’ चित्रपटाचीच कल्पना वापरली. सुरतमधून ट्रेनने बिहारमध्ये येऊन त्याने रात्री घरात प्रवेश केला आणि बाहेर झोपलेल्या वडिलांवर कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर पुन्हा सुरत गाठले. मात्र, पत्नीला केलेल्या एका फोनमुळे त्याचे लोकेशन पोलिसांच्या हात...
अहिल्यानगरच्या बालिकाश्रम रोडवर सायंकाळच्या वेळी अचानक घडलेल्या चाकूहल्ल्याने खळबळ उडाली. ५५ वर्षीय रविंद्र चव्हाण यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर नेमका कोण आणि हल्ल्यामागचे कारण काय, याचा शोध आता पोल...
‘भूत काढायचं आहे’ असं सांगून अघोरी विधी सुरू झाले... लिंबू, बाहुली आणि गोफणीचा वापर करण्यात आला. मात्र, या कथित विधींनंतर अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. फलटण शहर पोलिसांनी संशयिताला अटक केली असून पोक्सोसह जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सकाळची वेळ... ओळखीची व्यक्ती घरी आली आणि पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू झाला. काही क्षणांतच वाद इतका विकोपाला गेला की घरातच चाकूने चार ते पाच वार करण्यात आले. थेरगावातील या घटनेत काशीनाथ वावळे यांचा मृत्यू झाला. पत्नीने पोलिसांत धाव घेतल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
सायंकाळी साडेपाचची वेळ... तरुण दुचाकीवरून जात असतानाच अचानक तीन रिक्षा आणि कारमधून आलेल्या व्यक्तींनी त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. आंबेठाणमधील या धक्कादायक अपहरणाने पोलिसांची धावपळ उडाली. मात्र, सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने अखेर पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचवले आणि अवघ्या २४ तासांत तरुणाची सु...
मुंबई-गोवा महामार्गावरचा प्रवास अचानक काळाचा घाला ठरला. केंबुर्ली गावाच्या हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटताच इर्टिगा कार अनियंत्रित होऊन महामार्गालगतच्या शेतात जाऊन आदळली. भीषण अपघातात कारमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर रस्त्यावर काम करणारे दोन कामगार गंभीर जखमी झाले.
जेवण बाहेरून मागवलं म्हणून सुरू झालेला किरकोळ वाद इतका विकोपाला गेला की, पतीने संतापाच्या भरात स्वयंपाकघरातील कात्री उचलली. दारूच्या नशेत त्याने पत्नीवर वार केल्याने तिचा दंड जखमी झाला. अखेर जखमी पत्नीने पोलिसांत धाव घेतल्यानंतर आंबेगाव बुद्रुकमधील धक्कादायक प्रकार समोर आला.
परीक्षेची वेळ झाली, विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर पोहोचल्या; पण प्रश्नपत्रिका सोडा, परीक्षा सुरू करण्यासाठी आवश्यक संगणकच उपलब्ध नव्हते! पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील सण ब्राईट स्कूलमध्ये महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. सकाळी ९ ते ११ परीक्षा असतानाही विद्यार्थिनी केंद्राब...
नक्षलवाद्यांच्या बंदुकीच्या सावटात कर्तव्य बजावत असलेल्या जवानासमोर अचानक वेगळेच संकट उभे ठाकले. अंघोळीसाठी गेलेल्या राहुल शिनगारे यांच्या हाताला विषारी सापाने दंश केला. सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
मैत्रिणीच्या माध्यमातून झालेली ओळख, त्यानंतर कॅफेत नेऊन अत्याचार आणि कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी... तब्बल महिनाभर पीडित मुलगी गप्प राहिली. मात्र, ४ ऑक्टोबरला आरोपीने तिच्या घरी जाऊन पुन्हा दबाव टाकल्यानंतर अखेर धक्कादायक प्रकाराचा उलगडा झाला.