एक क्लिक अन् होऊ शकतं मोठं नुकसान! अशी ओळखा स्कॅमर्सनी बनवलेली बनावट वेबसाईट, वाचा सविस्तर
ही बनावट वेबसाईट अगदी खऱ्या वेबसाईटसारखी दिसत होती, ज्यामुळे सामान्य माणसांना खऱ्या आणि खोट्या वेबसाईटमधील फरक ओळखणं अत्यंत कठीण होऊ शकतं. ही बाब समोर येताच, सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने देशभरातील लोकांना सावध करण्यासाठी त्वरित एक सार्वजनिक सूचना जारी केली आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
स्कॅमर्सनी आता थेट सर्वोच्च न्यायालयाला लक्ष केले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. कारण सध्याच्या डिजीटील काळात अनेक कामं इंटरनेटद्वारे केली जातात. यासाठी विविध वेबसाईट्सचा वापर केला जातो. पण तुम्ही वापरत असलेली वेबसाईट नकली असेल तर? आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, एक सामान्य माणूस खऱ्या आणि खोट्या वेबसाईटमधील फरक कसा ओळखू शकतो? याबाबत आता काही टिप्स जाणून घेऊया.
Ans: वेबसाईटची URL, डोमेन नाव, संपर्क माहिती आणि सुरक्षा प्रमाणपत्र तपासून ती खरी आहे की बनावट, याचा अंदाज घेता येतो.
Ans: भारतातील अनेक अधिकृत सरकारी वेबसाईटच्या URL मध्ये .gov.in किंवा .nic.in हे डोमेन असते. मात्र, केवळ डोमेन पाहून खात्री न करता अधिकृत सरकारी स्रोतावरून लिंक तपासावी.
Ans: नाही. HTTPS कनेक्शन सुरक्षित असल्याचे दर्शवते; पण वेबसाईट अधिकृत किंवा विश्वासार्ह असल्याची हमी देत नाही.






