Raigad News: एकीकडे दुष्काळाची चिंता, दुसरीकडे पाण्याची नासाडी! श्रीवर्धनमध्ये रस्त्यालगत जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया
श्रीवर्धनला जोडणाऱ्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यालगत जमिनीखालून जाणारी पाण्याची जलवाहिनी फुटली आहे. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.