डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स... Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत
आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर
जिओच्या या प्लॅनची किंमत 1,799 रुपये आहे. हा एक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनच्या संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान यूजर्सना एकूण 252GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनची विशेष गोष्ट म्हणजेच यामध्ये यूजर्सना नेटफ्लिक्सचे बेसिक सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. ज्यामुळे भरपूर डेटासोबत यूजर्सना ओटीटीचा आनंद देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
जिओचा 1,799 रुपयांचा प्रीपेड प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना दररोज 3GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जात आहे. डेली डेटा लिमीट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps होणार आहे. तसेच, या जिओ प्लॅनमध्ये यूजर्सना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळणार आहे. प्लॅनमध्ये पात्र यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटा देखील ऑफर केला जाणार आहे. मात्र या डेटाचा वापर करण्यासाठी यूजर्सकडे 5G सपोर्ट वाला स्मार्टफोन, जिओ 5G नेटवर्क कवरेज आणि रिलेवेंट एलिजिबिलिटी असणं गरजेचं आहे.
इतकंच नाही तर, या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सचे बेसिक सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. याद्वारे यूजर्स नेटफ्लिक्सवर उपलब्ध असणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घेऊ शकणार आहेत. याशिवाय, प्लॅनमध्ये जिओटिव्ही आणि जिओएआयक्लाऊडचा ॲक्सेस देखील मिळणार आहे. प्लॅनमध्ये जिओएआयक्लाऊडवर 50GB फ्री क्लाउड स्टोरेज देखील मिळणार आहे.
तसेच, या प्लॅनमध्ये जिओहॉटस्टारचे मोबाईल+हॉलीवूड सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. प्लॅनमध्ये 18 महिन्यांचे गुगल जेमिनी प्रो प्लॅन देखील मोफत मिळणार आहे, ज्याची किंमत 35,100 रुपये आहे. प्लॅनमध्ये 5,000GB क्लाउड स्टोरेज आणि नॅनो बनाना सारखे AI फीचर्स देखील मिळणार आहेत. प्लॅनमध्ये 12 महिन्यांचे कॅन्व्हा प्रो लाईट सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे.
Ans: जिओच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे.
Ans: या प्लॅनमध्ये दररोज 3GB हाय-स्पीड डेटा मिळतो. संपूर्ण 84 दिवसांच्या वैधतेदरम्यान एकूण 252GB डेटा मिळतो.
Ans: होय, या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळते.






