आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर
ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन. मात्र आता किपॅड फोनचा वापर करणाऱ्या यूजर्सना डिजिटल पेमेंटची सुविधा मिळणार आहे. यामुळे ऑनलाईन पेमेंट करणं अधिक सोपं होणार आहे. याबाबत Itel ने घोषणा केली आहे. Itel ने त्यांच्या फीचर फोन Itel 2165C मध्ये फोनपेचा सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. या इंटीग्रेशनद्वारे यूजर्स कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील डिजिटल पेमेंट सुविधा वापरू शकणार आहेत. विशेष म्हणजेच याद्वारे 2G नेटवर्कवर आधारित असणाऱ्या यूजर्सपर्यंत यूपीआय आधारित पेमेंट सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. (फोटो सौजन्य: Itel)
Itel 2165C एक फीचर फोन आहे. यामध्ये 2 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 1,200mAh बॅटरी मिळणार आहे. कंपनीने बॅटरीचा वापर नियंत्रित करण्यासाठी ‘एआय बॅटरी’ आणि ‘सुपर बॅटरी मोड’ सारखे पर्यायही उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर 11.67 तासांपर्यंत टॉक टाइम आणि 25 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देऊ शकतो. तथापी, बॅटरी बॅकअप वापर आणि नेटवर्क स्थितीवर अवलंबून असणार आहे. यामध्ये 32GB पर्यंत एक्सपेंडेबल स्टोरेजची सुविधा देण्यात आली आहे.
Itel 2165C मध्ये फोननेचा सपोर्ट मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सुविधा अशा यूजर्ससाठी सुरु करण्यात आली आहे, जे स्मार्टफोनऐवजी किपॅड फोनचा वापर करतात. या इंटीग्रेशनद्वारे यूजर्स कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय डिजिटल पेमेंट करू शकणार आहेत. कंपनीचा उद्देश 2G नेटवर्कचा वापर करणाऱ्या यूजर्सना देखील भारताच्या यूपीआय आधारित डिजिटल पेमेंट सिस्टिमसोबत जोडण्याचा आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, याचा उद्देश दैनंदिन जीवनात वापरले जाणारे तंत्रज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
Ans: Itel 2165C या फीचर फोनमध्ये PhonePe सपोर्ट देण्यात येणार आहे. यामुळे कीपॅड फोन वापरणाऱ्या ग्राहकांनाही डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध होण्याचा प्रयत्न आहे.
Ans: कंपनीच्या घोषणेनुसार, या इंटिग्रेशनद्वारे इंटरनेट कनेक्शनशिवाय डिजिटल पेमेंट करता येणार आहे. मात्र, व्यवहारांची प्रक्रिया आणि त्यासाठीच्या अटींबाबत सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
Ans: या फोनमध्ये 2 इंचांचा डिस्प्ले, 1,200mAh बॅटरी आणि 32GB पर्यंत एक्सपेंडेबल स्टोरेज मिळते. यात AI Battery आणि Super Battery Mode हे पर्यायही आहेत.






