Movie Review – Marathi News | Live News in Marathi | मराठी बातम्या | US-Israel-Iran War

The India Story Review: दमदार विषय, पण कमकुवत स्क्रीनप्लेमुळे फिका पडला श्रेयस तळपदेचा चित्रपट
अभिनेता श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट एका अत्यंत गंभीर सामाजिक विषयावर भाष्य करतो. शेतीमध्ये कीटकनाशकांचा वाढता वापर आणि त्याचे मानवी आरोग्यावर होणारे घातक परिणाम या विषयाला चित्रपटाने हात घातला आहे. विषय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा असला, तरी कमकुवत पटकथा आणि प्रभावी मांडणीचा अभाव यामुळे चित्रपट अपेक्षित उंची गाठू शकत नाही.

चित्रपटाची कथा माजी लष्करी अधिकारी मेजर योगेश पाटील (श्रेयस तळपदे) यांच्याभोवती फिरते. त्यांच्या सात वर्षांच्या मुली परी (त्रिशा शारदा) हिला रक्ताचा कर्करोग झाल्याचं निदान होतं. उपचारासाठी सर्वस्व पणाला लावूनही योगेश आपल्या मुलीला वाचवू शकत नाही. पुढे त्याला समजतं की अन्नातील घातक कीटकनाशकांमुळेच तिचा कर्करोग झाला होता. त्यानंतर तो सरकार, कीटकनाशक उत्पादक कंपन्या आणि अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी रसायनांचा अतिवापर करणाऱ्या व्यवस्थेविरोधात न्यायालयीन लढा उभा करतो.

या लढ्यात त्याची साथ देते वकील अर्चना (काजल अग्रवाल). न्यायालयात ती कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे देशात वाढणाऱ्या कर्करोगाच्या घटनांकडे लक्ष वेधते. योगेश आणि अर्चना यांची ही न्यायासाठीची लढाई शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करते.

लेखक सागर बी. शिंदे यांनी सत्य घटनांपासून प्रेरणा घेत कथा लिहिली आहे. पंजाबमधील प्रसिद्ध ‘कॅन्सर ट्रेन’, केरळमधील कर्करोगाचे हॉटस्पॉट, फळे-भाज्यांवर होणारी रासायनिक फवारणी आणि भेसळयुक्त दूध यांसारख्या वास्तव समस्यांवर चित्रपट प्रकाश टाकतो. त्यामुळे चित्रपटाचा आशय निश्चितच प्रभावी आणि समकालीन वाटतो.

Jana Nayagan Box Office Collection: विजयच्या ‘जन नायकन’ची दणदणीत सुरुवात; पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई

मात्र, दिग्दर्शक चेतन डीके या गंभीर विषयाला प्रभावी सिनेमॅटिक अनुभवात रूपांतरित करण्यात कमी पडतात. चित्रपटाची पटकथा न्यायालयीन नाट्य आणि भावनिक प्रसंगांमध्ये सतत हेलकावे खाते. त्यामुळे कथानकाचा प्रवाह विस्कळीत वाटतो. पूर्वार्ध काहीसा माहितीपटासारखा भासतो, तर न्यायालयीन संघर्षात आवश्यक ती धार आणि थरार जाणवत नाही. विरोधी बाजूचा युक्तिवादही पुरेशा ताकदीने मांडला जात नसल्याने संघर्ष एकतर्फी वाटतो.

अभिनयाच्या बाबतीत श्रेयस तळपदे ने दुःख, संताप आणि संघर्ष यांचा समतोल साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. काजल अग्रवालची भूमिका संयमी असून तीनेही आपल्या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे. बालकलाकार त्रिशा शारदा हिचाही अभिनय प्रभावी ठरतो.

Kissing Controversy: किसिंग वादानंतर अभिजीत भट्टाचार्यांनी उदित नारायण यांना दिला होता खास सल्ला; वर्षभरानंतर केला मोठा खुलासा

Jana Nayagan Box Office Collection: विजयच्या ‘जन नायकन’ची दणदणीत सुरुवात; पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई
अभिनेता-राजकारणी थलपथी विजयचा बहुप्रतिक्षित ‘जन नायकन’ हा चित्रपट अखेर २३ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित झाला. एच. विनोद दिग्दर्शित या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या, तरी बॉक्स ऑफिसवर मात्र चित्रपटाने जोरदार सुरुवात केली आहे.

SACNILC च्या प्राथमिक अंदाजानुसार, ‘जन नायकन’ने भारतात पहिल्याच दिवशी तब्बल ४१ कोटी रुपयांची कमाई केली. देशभरात हा चित्रपट १३,०६७ शोमध्ये प्रदर्शित झाला. भारतात सुमारे ४८.२७ कोटी रुपये ग्रॉस, तर परदेशात ३० कोटी रुपये कमावत चित्रपटाने जगभरात एकूण ७८.२७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. यामुळे २०२६ मधील सर्वात मोठ्या तमिळ ओपनिंगपैकी एक म्हणून ‘जन नायकन’ची नोंद झाली आहे.

चित्रपटाच्या कमाईत तमिळ आवृत्तीचा सर्वाधिक वाटा राहिला. तमिळ भाषेत चित्रपटाने ३६.५० कोटी रुपये, तर तेलुगू आवृत्तीने २.७५ कोटी रुपये कमावले. सर्व भाषांमधील एकूण प्रेक्षक उपस्थिती ४१.६० टक्के नोंदवली गेली. विशेष म्हणजे तामिळनाडूमध्ये विजयच्या चाहत्यांनी चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अनेक चित्रपटगृहांमध्ये उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं.

तमिळ आवृत्तीची एकूण ऑक्युपन्सी ६८.३१ टक्के होती. सकाळच्या शोमध्ये ७३.८५ टक्के, दुपारच्या शोमध्ये ६२.४६ टक्के, संध्याकाळी ६३.६२ टक्के, तर रात्रीच्या शोमध्ये पुन्हा ७३.३१ टक्के प्रेक्षक उपस्थिती नोंदवली गेली. तेलुगू आवृत्तीची एकूण ऑक्युपन्सी २७.८१ टक्के, तर हिंदी आवृत्तीची १४.६० टक्के होती.

‘गौरवपेक्षा माझा कुत्रा बरा…’, ‘Lock Upp 2’मध्ये आकांक्षा चमोलाचं वादग्रस्त वक्तव्य; नेटकऱ्यांनी चांगलंच धरलं धारेवर

दमदार स्टारकास्ट

एच. विनोद दिग्दर्शित हा चित्रपट थलपथी विजयच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट असल्याची चर्चा आहे. चित्रपटात विजयने वेत्री कोंडन या निर्भीड माजी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आपल्या दत्तक मुलीला सैनिक बनवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या या पात्राची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

चित्रपटात बॉबी देओल खलनायक जॉन हिमलरच्या भूमिकेत दिसतो. याशिवाय पूजा हेगडे, ममिता बैजू, प्रकाश राज, गौतम वासुदेव मेनन, प्रियामणी आणि नरेन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

पहिल्याच दिवशीच्या दमदार कमाईनंतर आता ‘जन नायकन’ पहिल्या वीकेंडमध्ये किती गल्ला जमवतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Ramayana Trailer: ‘रामायणम्’चा ट्रेलर लांबणीवर; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नमित मल्होत्रांची मोठी घोषणा?

Jana Nayagan Review: विजयच्या अभिनयावर कौतुकाचा वर्षाव; दिग्दर्शनावर टीका, बॉबी देओलच्या भूमिकेवरही नाराजी
Vijay Thalapathy Movie:   तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय ( Vijay Thalapathy )यांचा ‘जना नायकन’ हा चित्रपट अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे प्रदर्शन हे थलपथीच्या चाहत्यांसाठी एका उत्सवासारखे आहे. कालपासून उत्साही चाहते सर्वत्र कार्यक्रमांचे आयोजन करताना दिसत आहेत. काही जण नाचून, तर काही जण फटाके फोडून आनंद साजरा करत आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

विजयच्या सिग्नेचर स्टाईलमुळे संताप

बहुसंख्य नेटकऱ्यांनी ‘जना नायकन’ चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विजयच्या सिग्नेचर हात हलवण्याच्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पडद्यावर हे दृश्य दिसताच चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक वेड्यासारखे ओरडत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

चित्रपटात विजयचा धमाकेदार डान्सही पाहायला मिळाला आहे. सिनेमा हॉलमधील एक क्लिप शेअर करत एका युझरने लिहिले, ‘थलपथीने स्टेजवर आग लावली’. जेव्हा विजय पडद्यावर नाचताना दिसला, तेव्हा सिनेमा हॉलमधील त्याचे चाहतेही नाचू लागले.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की चित्रपट प्रदर्शनापूर्वीच लीक झाला होता. त्यानंतर, चित्रपटात काही बदल करण्यात आले. चित्रपटात विजयला मुख्यमंत्री म्हणूनही सादर करण्यात आले आहे. सीएम टायटल कार्ड व्हायरल झाले आहे. त्याहूनही अधिक रंजक गोष्ट म्हणजे, चित्रपटापेक्षाही चित्रपटगृहांमधील वातावरण अधिक पाहण्यासारखे आहे. लोक गटागटाने जाऊन जल्लोष करत आहेत.

The Scam-Leaked: पेपरफुटीचं भयावह सत्य उलगडणार? विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘द स्कॅम लीक्ड’चा टीझर प्रदर्शित

विजयचा जपानी चाहता चित्रपट पाहण्यासाठी दाखल

भारतीय प्रेक्षकांसोबतच परदेशी चाहतेही चित्रपटाबद्दल उत्साह व्यक्त करत आहेत. अभिनेत्याचा एक जपानी चाहता चित्रपट पाहण्यासाठी दिल्लीतील एका चित्रपटगृहात आला.

THALAPATHY FIR ON #JanaNayagan@TVKVijayHQ pic.twitter.com/TzXcQMxvX9

— Syedminhaj (@munnanash) July 23, 2026

काही प्रेक्षकांना क्लायमॅक्स कमकुवत वाटला

नेटिझन्स ‘जना नायकन’चे कौतुक करत लिहित आहेत, “त्याची जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स पाहण्यासारखी आहे. ‘कचेरी’ गाण्यातील नृत्य उत्कृष्ट आहे. टायटल कार्ड, इंट्रो, इंटरव्हल, फ्लॅशबॅक आणि शाळेतील सीन अप्रतिम आहेत. व्हिलन ट्रॅक आणि क्लायमॅक्स कमकुवत आहेत. काही घटक विचित्र आणि भावनाशून्य असले तरी, थलपथीचे काही क्षण या चित्रपटाला एक पाहण्याजोगा मनोरंजक चित्रपट बनवतात.” दरम्यान, एका युझरने लिहिले, “‘जना नायकन’ विजयच्या चाहत्यांसाठी सहन करण्याजोगा असला तरी, इतरांसाठी तो अजिबात सहन करण्याजोगा नाही. आता आम्हाला कळले की चित्रपटाच्या टीमनेच तो का लीक केला.”

Sonu Nigam: ‘शी… अशा कलाकारांना लाज वाटली पाहिजे’; विद्यार्थी आंदोलनावर सोनू निगमचं वक्तव्य चर्चेत; सोशल मीडियावर संतापाची लाट

Bol Bol Rani Movie Review : ही गुंतागुंतं कधी सुटणार का? ‘बोल बोल राणी’ आज सिनेमागृहात! सईच्या अभिनयाने प्रेक्षक दंग
‘बोल बोल राणी’ सिनेमा अखेर सिनेगृहात आला आहे.

‘लोक वेगवेगळ्या प्रकारे सत्य कसे पाहतात?’ यावर हा सिनेमा लक्ष खिळवून ठेवतो.

चिन्मय मांडलेकर, संभाजी ससाणे आणि सुबोध भावे यांच्या अभिनयाचेही कौतुक करण्यात आले आहे.

सई ताम्हणकर स्टारर सिनेमा ‘बोल बोल राणी’ आज सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन सिड विन्सूरकरने केले आहे. सईच्या अभिनयाने प्रेक्षक दंग झाले आहेत. या थरारक सिनेमामध्ये सई ताम्हणकरसह अभिनेता सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर तसेच अभिनेता संभाजी ससाणे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या तिन्ही पात्रांभोवती संपूर्ण सिनेमाची गोष्ट फिरते. मराठी मर्डर मिस्ट्री सिनेमा असल्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी अनेक मराठी नजरा आतुर होत्या. हा सिनेमा अखेर सिनेगृहात आला आहे.
Tarini Seial: ‘तारिणी’मध्ये नवा ट्विस्ट! कमिशनर जे.जे.च्या एंट्रीने तपासाला मिळणार नवं वळण; मानसी कुलकर्णीने उलगडलं भूमिकेचं गुपित

‘बोल बोल राणी’ हा सिनेमा Rashomon Effect या संकल्पनेतून दाखवण्यात आला आहे. एकंदरीत, एका खुनाची कथा तीन वेगवेगळ्या साक्षीदारांच्या दृष्टिकोनातून दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिनेमा समजणे आणखीन सोपे होऊन जाते, असे आपल्याला वाटते. पण एखाद्या बाजूला तीन भिन्न बाजूंनी दाखवण्यात आले तर बाजू समजणे गुंतागुंतीचे होऊन जाते. सिनेमा पाहताना सिनेमाकडे लक्ष असणे अतिशय आवश्यक आहे. सिनेमात खून झाला आहे. परंतु ‘तो खुन कुणी केला?’ यापेक्षा ‘लोक वेगवेगळ्या प्रकारे सत्य कसे पाहतात?’ यावर हा सिनेमा लक्ष खिळवून ठेवतो.

‘बोल बोल राणी’ या सिनेमात ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी दाखवण्यात आल्यामुळे या चित्रपटाकडे प्रेक्षक जास्त प्रमाणात आकर्षित होत आहेत. सिनेमाची नाट्यपूर्ण मांडणी या सिनेमाचे बलस्थान आहे. सिनेमा प्रदर्शित होताच विविध वाहिन्यांवरील सिनेमा विश्लेषकांनी सईच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले आहे. सई ताम्हणकर या सिनेमाची केंद्रबिंदू आहे. तसेच चिन्मय मांडलेकर, संभाजी ससाणे आणि सुबोध भावे यांच्या अभिनयाचेही कौतुक करण्यात आले आहे.

Jr NTR: बालकलाकार ते ग्लोबल स्टार! सुपरस्टार एनटीआरबद्दलच्या ‘या’ ७ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

काही विश्लेषकांच्या मते, सिनेमा गुंतागुंतीचा आहे. कधीकधी ती अधिक क्लिष्ट वाटते. सिनेमा जरी दोन तास प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवत असला तरी शेवटी कथेत इतका भावनिक वजन दिसून येत नाही. कदाचित, सर्व प्रश्नांची उत्तरे देणे या सिनेमाचा उद्देश नसेल. एकंदरीत, “बोल बोल राणी” हा सिनेमा धाडसी, वेगळा आणि विचार करायला लावणारा प्रयोग आहे.

Welcome To The Jungle Review: कॉमेडी, इमोशन आणि मनोरंजनाचा फुल्ल डोस; अक्षय-सुनीलची जोडी पुन्हा जिंकणार मनं
काय आहे चित्रपटाची कथा?

चित्रपटात कलाकरांची तगडी फौज

अक्षय-सुनीलची जोडी पुन्हा जिंकणार मनं

Review By: आकाश जायसवाल
Rating For the Movie: 3.5*/5

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. ‘वेलकम टू द जंगल’ (वेलकम टू द जंगल रिव्ह्यू) या चित्रपटाद्वारे अक्षय कुमारने बॉक्स ऑफिसवर जोरदार पुनरागमन केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अहमद खान यांनी केले आहे. फिरोज ए. नाडियाडवाला, स्टार स्टुडिओ १८, सीता फिल्म्स आणि राकेश डांग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चाहते बऱ्याच काळापासून ‘वेलकम टू द जंगल’च्या प्रदर्शनाची वाट पाहत होते. आता ‘वेलकम टू द जंगल’ प्रदर्शित झाल्याने, लोक चित्रपटगृहांकडे गर्दी करत आहेत.

काय आहे चित्रपटाची कथा?

चित्रपटाची कथा एका प्रभावशाली उद्योगपतीभोवती फिरते. सरकार बदलल्यास आपल्या काळ्या पैशांचा पर्दाफाश होईल, या भीतीने तो हजारो कोटी रुपयांचा चित्रपट बनवून तो मुद्दाम फ्लॉप करण्याचा प्लॅन आखतो. यासाठी फ्लॉप दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांची टीम तयार केली जाते.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मात्र अनपेक्षित घटना घडते. रील लाइफमध्ये गावाला दहशतवाद्यांपासून वाचवणारे कलाकार खऱ्या आयुष्यातही दहशतवाद्यांच्या तावडीत अडकतात. त्यानंतर सुरू होतो ॲक्शन, कॉमेडी आणि भावनिक प्रसंगांनी भरलेला थरारक प्रवास. पुढे काय घडते, यासाठी चित्रपटगृहात जाऊनच अनुभव घ्यावा लागेल.

Prahaar Teaser Out: राजकुमार रावच्या दमदार अभिनयाने सोशल मीडियावर माजवली खळबळ; 1 मिनिट 54 सेकंदांच्या टीझरने वाढवली उत्सुकता

चित्रपटात कलाकरांची तगडी फौज

तब्बल २ तास ४३ मिनिटे लांबीच्या या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अरशद वारसी, जॉनी लिव्हर, परेश रावल, राजपाल यादव, जॅकी श्रॉफ, श्रेयस तळपदे, आफताब शिवदासानी, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, लारा दत्ता आणि फरिदा जलाल यांची तगडी स्टारकास्ट आहे.

अभिनय कसा आहे?

अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकते. दोघांची केमिस्ट्री जुन्या सुपरहिट चित्रपटांची आठवण करून देते. जॉनी लिव्हर, परेश रावल, अरशद वारसी आणि राजपाल यादव यांनी त्यांच्या भन्नाट कॉमिक टायमिंगने प्रत्येक प्रसंग रंगतदार केला आहे. जॅकी श्रॉफ आणि इतर कलाकारांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.

Kamali TRP : टीआरपीच्या शर्यतीत ‘कमळी’ अव्वल; ठरलं तर मग’ला मागे टाकत बनली महाराष्ट्राची नंबर १ मालिका

संगीत आणि पार्श्वसंगीत

चित्रपटातील गाणी मनोरंजनाचा दर्जा उंचावतात. विशेष म्हणजे भोजपुरी गाण्याचा तडका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. पार्श्वसंगीतही ॲक्शन आणि भावनिक प्रसंगांना प्रभावी साथ देते.

पाहावा की नाही?

‘वेलकम टू द जंगल’ हा केवळ कॉमेडी चित्रपट नाही, तर त्यात ॲक्शन, इमोशन आणि फॅमिली एंटरटेनमेंटचा उत्तम संगम आहे. एवढी मोठी स्टारकास्ट असूनही दिग्दर्शक अहमद खान यांनी प्रत्येक कलाकाराला योग्य वाव दिला आहे. त्यामुळे हा चित्रपट विकेंडला संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासाठी उत्तम पर्याय ठरतो.

Tumbadchi Manjula : कधी विनोदाचा मेळा तर कधी आसवांचा झरा! विविध भावनांनी विणलेली एक सुंदर कलाकृती ‘तुंबाडची मंजुळा’
हा चित्रपट पुढील काळातही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल.

मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सिनेमागृहांकडे मोठी गर्दी केली आहे.

पाश्चिमात्य सुरांचा हलका स्पर्श!

सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट गाजलेल्या कन्नड चित्रपट ‘Su From So’ चा रिमेक असला, तरी त्यातील कलाकारांचा उत्कृष्ट विनोदी अभिनय, लक्षवेधी संगीत आणि चित्रपट साकारण्यासाठी संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने सुमारे ₹9.34 कोटींची ग्रॉस कमाई केली असून, अनेक बॉक्स ऑफिस विश्लेषकांच्या मते त्याची एकूण कमाई ₹15 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट सध्या चौथ्या स्थानावर कायम आहे. विश्लेषकांच्या अंदाजानुसार चित्रपटाचे नेट कलेक्शन किमान ₹15 कोटींपर्यंत पोहोचू शकते. मात्र, तिसऱ्या क्रमांकावरील ‘क्रांतीज्योती विद्यालय’ या चित्रपटाने सुमारे ₹27.35 कोटींचे नेट कलेक्शन केले असल्याने ‘तुंबाडची मंजुळा’ला तो टप्पा गाठणे सध्या तरी आव्हानात्मक वाटत आहे. असे असले तरी, वाढती लोकप्रियता आणि प्रेक्षकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता हा चित्रपट पुढील काळातही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Alliance OTT Show: 240 देशांमध्ये रंगणार ‘अलायन्स’; कुणाल खेमू होस्ट करणार प्राइम व्हिडिओचा पहिला डेली रिअॅलिटी शो!

या चित्रपटाला खऱ्या अर्थाने चार चांद लावले आहेत ते त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयाने! प्रत्येक कलाकाराने उत्कृष्ट कॉमिक टाइमिंग साधत आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. विशेष म्हणजे, इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर अथर्व रुकेने याच चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असून, त्याच्या चाहत्यांनीही त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सिनेमागृहांकडे मोठी गर्दी केली आहे.

चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे त्याची भावनिक मांडणी. मध्यंतरापूर्वी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा सिनेमा, मध्यंतरानंतर मात्र अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणतो. विनोद, भावना, मस्ती आणि मनोरंजन यांचा सुंदर मेळ साधणारा हा चित्रपट कॉमेडीप्रेमींसाठी एक खास पर्वणी ठरतो.

‘पत्नीने बेड शेअर करणे केले बंद… ’; खलनायकाची भूमिका पडली महागात, अभिनेत्याने सांगितली नात्यातील दुराव्याची कहाणी

संगीताच्या बाबतीतही चित्रपटाने वेगळी छाप सोडली आहे. ‘अस्सं वेगळं गाव’ हे गीत कोकणातील निसर्गसौंदर्य आणि गावकुसातील वातावरण जिवंतपणे उभे करते. संगीतकार विशाल दादलानी यांच्या आवाजातील ‘तर्राट’ हे गाणे उत्साहाने भरलेले परफेक्ट पार्टी सॉंग वाटते. ‘पुन्हा-पुन्हा’ या गाण्यात अनेक वर्षांनंतर जुन्या प्रेमाची झालेली भेट आणि त्यातून जाग्या होणाऱ्या भावना प्रभावीपणे व्यक्त होतात, तर ‘नभ सोनेरी सोनेरी’ हे गीत प्रेम मिळाल्याचा आनंद साजरा करते. या सर्व गाण्यांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारे गीत म्हणजे ‘हे देवा मला पाव की रे’. मराठी शब्दरचना असूनही या गाण्याच्या चालीत जाणवणारा पाश्चिमात्य सुरांचाहलका स्पर्श त्याला वेगळेपण देतो आणि त्यामुळेच ते श्रोत्यांच्या मनात सहज घर करून जाते.

Web Series Review : सस्पेन्स… थ्रिल… मनोरंजन! फक्त गुन्हेगार नाही, प्रेक्षकांचे लक्ष कैद करणारा ‘Detective Dhananjay’
बाबुराव अर्नाळकर यांच्या गाजलेल्या रहस्यकथांना आधुनिक तापशैलीची जोड!

दोन गूढ खून आणि त्यामागचा तपास!

रहस्यकथांचा गाभा कायम ठेवत त्याला डिजिटल युगाची झलक!

दर्जेदार मराठी सस्पेन्स आणि तपासकथांच्या चाहत्यांसाठी “डिटेक्टिव्ह धनंजय: रहस्यजाळ” हा एक उत्तम पर्याय!

Web Series Review : सध्या मराठी सिनेचाहत्यांना ‘Detective Dhananjay: Rahasyajaal’ या Web Series ने वेड लावले आहे. ही मालिका Marathi मिस्ट्री-थ्रिलर असून ZEE5 वर प्रदर्शित करण्यात आली आहे. एकूण 7 भागांमध्ये ही मालिका प्रदर्शित करण्यात आली आहे. चंद्रकांत सखाराम चव्हाण म्हणजेच सुप्रसिद्ध लेखक बाबुराव अर्नाळकर यांच्या गाजलेल्या रहस्यकथांना आधुनिक तापशैलीची जोड या मालिकेत देण्यात आली आहे. या मालिकेत एक वेगळीच रोमांचक दुनिया उभारण्यात आली आहे. ही सिरीज पाहताना, एक मात्र लक्षात येते की कथानकाची गती थोडी मंदावते, मात्र अभिनेता आदिनाथ कोठारे याचा संयमी अभिनय आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. सस्पेन्स थ्रिलरमध्ये संगीताचं महत्त्व मोठं असतं आणि या सीरिजमध्ये BGM ने ते रहस्य टिकवून ठेवले.
चित्रपट महामंडळाची निवडणूक होणार, पण ट्विस्ट अजून बाकी! ‘या’ १० जूनला हायकोर्ट काय निर्णय देणार?

‘Detective Dhananjay: Rahasyajaal’ या Web Series च्या सुरुवातीला झालेली दोन गूढ खून आणि त्यामागचा तपास दाखवला जातो. तपास जसजसा पुढे सरकतो, तसतसा एका मोठ्या हिरे तस्करी रॅकेटचे धागेदोरे समोर येऊ लागतात. मग आपल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर गुन्हेगार कशा शोधला जातो? हे पाहणे फार महत्वाचे ठरते. एकंदरीत, ही संपूर्ण सिरीज गुन्ह्यांमागील गुन्हेगाराची मानसिकता, स्वार्थ आणि मानवी भावनांचा देखील अभ्यास करते.

‘Detective Dhananjay: Rahasyajaal’ या Web Series मध्ये दोन वेगळ्या मानवी स्वभावाचे मुख्य पात्र दाखवण्यात आले आहे. Adinath Kothare यांनी डिटेक्टिव्ह धनंजय हे पात्र साकारले आहे. या पत्राचा स्वभाव अगदी शांत आणि बारकाईने निरीक्षण करणारा तसेच बुद्धिमान दाखवण्यात आले आहे. तर अभिनेता Pushkaraj Chirputkar ने ‘छोटू’ नावाचे पात्र साकारले आहे. Chhotu ला आधुनिक तंत्रज्ञान आणि सायबर तपासात पारंगत दाखवण्यात आले आहे. त्याने डिटेक्टिव्ह धनंजयला दिलेली सोबत या कथेला आधुनिक रंग देते.

“चाळीत कैरी चोरण्याची मज्जा वेगळीच होती” योगिता चव्हाणने दिला उन्हाळाच्या आठवणींना उजाळा

लेखक Girish Joshi आणि दिग्दर्शक Shrirang Godbole यांनी पारंपरिक रहस्यकथांचा गाभा कायम ठेवत त्याला डिजिटल युगाची झलक दिली आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्या पिढीतील प्रेक्षकांना ही मालिका सहज जोडून घेते. ७ भागांच्या या मालिकेत काही ट्विस्ट आधीच ओळखू येतात आणि काही प्रसंगांमध्ये संथपणा जाणवतो. तरीसुद्धा दर्जेदार मराठी सस्पेन्स आणि तपासकथांच्या चाहत्यांसाठी “डिटेक्टिव्ह धनंजय: रहस्यजाळ” हा एक उत्तम पर्याय ठरतो.

टीप – कथेची मांडणी थोडी विस्कळीत वाटते. सुरुवातीचे काही भाग खूप लांबलेले वाटतात आणि शेवटचा भाग सगळी माहिती एकत्र कोंबल्यासारखा वाटतो. हे Balance राखले असते तर सीरिजचा प्रभाव वाढला असता.