लग्न ठरलं, दुसऱ्याच दिवशी बघण्याचा कार्यक्रम; क्रिकेट खेळताना ३५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू, रत्नागिरीत हळहळ
आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात होणार होती, लग्न ठरलं होतं आणि सोमवारी घरी मुलीकडची मंडळीही येणार होती. मात्र, या आनंदाच्या क्षणाआधीच चवंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मित्रांसोबत क्रिकेट खेळताना अचानक चक्कर येऊन ३५ वर्षीय स्मित चवंडे कोसळला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रत्नागिरीत हळहळ व