Psychology: करिअरच्या दृष्टीने एक युनिक आणि उत्तम विषय; जाणून घ्या संधी आणि व्याप्ती!
दिल्ली: १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर लाखो विद्यार्थी त्यांच्या करिअरबाबत चिंतेत असतात. सहसा विद्यार्थ्यांना पदवीचे अभ्यासक्रम निवडताना खूप त्रास होतो. अनेक विद्यार्थी कॉलेज आणि कटऑफ पाहून आपला कोर्स निवडतात, तर काही जण मित्र किंवा नातेवाईकांना पाहून तो निवडतात. पण कोर्स निवडण्याचे हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत. विद्यार्थ्यांनी ना कटऑफच्या आधारावर आणि ना कॉलेजच्या आधारावर कोर्स निवडला पाहिजे; तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला बीए ऑनर्स मानसशास्त्र (Psychology) या विषयाबद्दल सांगत आहोत.
दिल्ली विद्यापीठात खूप कमी काॅलेजमध्ये बीए ऑनर्स सायकॉलजी हा कोर्स उपलब्ध आहे. दौलतराम कॉलेज फॉर वुमन, इंद्रप्रस्थ कॉलेज फॉर वुमन, जिझस अँड मेरी कॉलेज, कमला नेहरू कॉलेज, केशव महाविद्यालय, लेडी श्रीराम कॉलेज, झाकिर हुसेन कॉलेज आणि अरबिंदो कॉलेज हा कोर्स शिकवला जातो. डीयूशिवाय जामिया मिलिया इस्लामियामधूनही हा कोर्स करता येतो. या कोर्सच्या ३ वर्षांच्या काळात तुम्ही मानसशास्त्राच्या अनेक विषयांचा अभ्यास कराल, ज्यामध्ये मानवी मानसशास्त्रापासून अनेक रंजक विषयांचा समावेश आहे.
CAT Exam Preparation: कॅट मॉक टेस्टमध्ये स्कोअर वाढत नाहीये? वापरा ‘हा’ ५-स्टेप फॉर्म्युला; पर्सेंटाइलमध्ये होईल मोठी वाढ!
बीए ऑनर्स मानसशास्त्र पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी केवळ थांबत नाहीत, तर पुढे मास्टर डिग्री आणि क्लिनिकल सायकोलॉजी, कौन्सिलिंग सायकोलॉजी किंवा ऑर्गनायझेशन बिहेवियर यांसारख्या विशेष विषयांमध्ये मास्टर किंवा पीएचडी करू शकतात. आजच्या स्पर्धात्मक युगात कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ‘ह्युमन रिसोर्सेस’ आणि ‘एम्प्लॉयी वेलफेअर’साठी देखील सायकॉलॉजीच्या पदवीधारकांना मोठी मागणी आहे.
Supreme Court Recruitment 2026: १० वी पास उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी! ‘या’ तारखेपासून करा अर्ज
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही मानसशास्त्रज्ञ बनू शकता. तसेच तुम्ही पुढे शिक्षण क्षेत्रात जाऊ शकता. संशोधन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही समाजसेवेच्या क्षेत्रातही जाऊ शकता. आजकाल एनजीओमध्येही (N.G.O) सायकोलॉजिस्टची गरज असते. एनजीओमध्ये सायकोलॉजिस्ट शोषण झालेल्या मुले आणि महिलांच्या वर्तनाचा अभ्यास करतात.
आजच्या काळात मानसशास्त्र हा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम करिअर पर्याय बनत चालला आहे, ज्यामध्ये भविष्य घडवण्याच्या अपार संधी आहेत.
Ans: हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी मानसशास्त्रज्ञ (Psychologist), संशोधन क्षेत्र किंवा एनजीओ (N.G.O) मध्ये सायकोलॉजिस्ट म्हणून काम करू शकतात, जिथे मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो.
Ans: हा कोर्स दौलतराम कॉलेज, इंद्रप्रस्थ कॉलेज, जिझस अँड मेरी कॉलेज, कमला नेहरू कॉलेज, केशव महाविद्यालय, लेडी श्रीराम कॉलेज, झाकिर हुसेन कॉलेज आणि अरबिंदो कॉलेजमध्ये उपलब्ध आहे.






