फोटो सौजन्य सोशल मिडिया
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को संकुलात पार पडणार आहे. यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदत देऊ केली जाणार असून दिवाळी गोड करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे.जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले ट्रक दुष्काळग्रस्त भागाकडे रवाना झाल्या आहेत.
यंदाचा दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना या साहित्याच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि दिवाळी फराळाचे साहित्य असणार आहे. किट्स ट्रक्सद्वारे हे साहित्य पाठण्यात आले आहेत.शेतकरी कुटुंबातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी 25 हजार शिलाई मशिन्सचे वाटप केले गेले आहेत.
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत तसेच मुलींना सायकलींचे वाटप सुद्धा करण्यात आले आहेत. यंदाचा नवरात्रोत्सव अनेक ठिकाणी साधेपणाने साजरा करून, ‘राजदांडिया’ आणि इतर कार्यक्रमांतून जमा झालेला निधी या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वळवण्यात आला आहे. “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही” हा निर्धार व्यक्त करत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट गावागावांत जाऊन हा शिधा पोहोचवत आहेत.
दसऱ्याच्या शुभेच्छा देत एकनाथ शिंदे यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना उपयुक्त वस्तू ठाण्यातून पाठवण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळ ग्रस्त ठिकांनाची पाहणी करत शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली.शेतकऱ्यांना मदत करून शिवसेनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जातील. त्याच्या घरावर तोरण बांधतील असे मत एकनाथ शिंदे यांनी केले. शिवसेना 80 टक्के राजकारण आणि 20 टक्के समाजकारण करते,ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे.असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दसऱ्या मेळाव्यात केले.






