Dharashiv farmers: धाराशिवमध्ये पीक विमा योजनेला मोठा प्रतिसाद! ४ लाख ७९ हजार अर्ज, २,५०७ कोटींचे विमा संरक्षण
Dharashiv farmers: धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातून ४ लाख ७९ हजार अर्ज प्राप्त झाले असून, ४ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्राला पीक विम्याचे संरक्षण मिळाले आहे. या क्षेत्रासाठी एकूण २,५०७ कोटी रुपयांची संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे.