सिद्धांत साळुंखे विजेता (फोटो- सोशल मिडिया)
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व ३० हजार रुपये, तर उपपविजेत्या खेळाडूला करंडक व २०हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आयएम चंद्रशेखर गोखले, देहूचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन कोंडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस देशमुख आणि बीजेपीचे उपाध्यक्ष महेश टापरे यांच्या हस्ते करण्यात आले.
Chess: बुद्धिबळाच्या पटावर सुयोग वाघने केले प्रतिस्पर्ध्याला केले चेकमेट! पटकावले विजेतेपद
यावेळी संतोष कोळी, आदित्य जगताप, विवेक भागवत, नागनाथ हळकुडे, सुनील घोडेराव, सॅनटन डिसुझा, शिवभूमी शिक्षण ट्रस्टचे संचालक, स्पर्धा संचालक व एमसीएचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे, चीफ आरबीटर आयए राजेंद्र शिदोरे आणि डेप्युटी चीफ आरबीटर आयए श्रद्धा विंचवेकर, संग्राम कोंडे आदी उपस्थित होते.
सिद्धांत साळुंखे(८.५गुण)वि.वि.अखिलेश नगारे(७गुण);
विरेश शरणार्थी(७.५गुण)बरोबरी वि.सुयोग वाघ(७.५गुण);
शितिज प्रसाद(६.५गुण)पराभूत वि.कशिश जैन(७.५गुण);
अविरत चौहान(६.५गुण)पराभूत वि.प्रियांशु पाटील(७.५गुण);
कवीश लिमये(६.५गुण) पराभूत वि.श्लोक शरणार्थी(७.५गुण);
साक्षी चितलांगे(७.५गुण)वि.वि.निर्गुण केवल(६.५गुण);
कुशाग्र जैन (७.५गुण)वि.वि.संकर्षा शेळके(६.५गुण);
अनिरुद्ध देशपांडे(६.५गुण)पराभूत वि.ओम लामकाने(७.५गुण);
पार्थ साळुंखे(६.५गुण) पराभूत वि.मिहीर सरवदे(७गुण);
निखिल दिक्षित(७गुण)वि.वि.उत्कर्ष भिलवाडे(६गुण)
कुठं बी जा, भारताचा नाद करायचा नाय! क्रिशव शाहची मलेशियात उत्तुंग भरारी, Chess स्पर्धेत…
सौरभ म्हामणे(७गुण)वि.वि.त्वेषा जैन(६गुण);
अभिजीत बिलपे(६.५गुण) बरोबरी वि.सक्षम भारद्वाज(६.५गुण);
मिठावाला लेख(६गुण)पराभूत वि.प्रेयस वाघमारे(७गुण);
निवाण अगरवाल(६गुण)पराभूत वि.रुतम मोहगावकर(७गुण);
प्रियांक अलिपोरवाला(६गुण)पराभूत वि.विराज सराफ(७गुण)
सुयोग वाघ ठरला विजेता
शिवभूमी शिक्षण ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित शिवभूमी आंतरराष्ट्रीय खुल्या फिडे ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुयोग वाघ याने विजेतेपद पटकावले. कात्रज येथील आरोह गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत पहिल्या पटावरील लढतीत सुयोग वाघने अविरत चौहानला बरोबरीत रोखत ८ गुण, ५५ बुकोल्स कट गुणसरासरीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.






