KDMC News: डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग, कर्मचारीही गायब! उपायुक्तांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये सुमित एलकोच्या कामाची पोलखोल
KDMC News: डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 27 मधील टिळकनगर, पाथर्ली, अंबिकानगर आणि गोग्रासवाडी परिसरातील कचरा व्यवस्थापनाची उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांनी अचानक पाहणी केली. पाहणीदरम्यान साफसफाई आणि कचरा वर्गीकरणाच्या कामातील त्रुटी निदर्शनास आल्यानंतर सुमित एलको कंपनीला कामकाज सुधारण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला.