Vedanta चा मोठा धमाका! (सौजन्य - सोशल मीडिया )
GST बाबत मोठा निर्णय लांबणीवर! Council Meeting ची तारीख पुन्हा बदलली; नेमकं काय आहे कारण?
वेदांताच्या मॅनेजमेंट टीमने आगामी आर्थिक वर्षासाठी आपला पहिला अंतरिम डिविडेंड जाहीर केला आहे. कंपनीने या लाभांशासाठी १४ ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. पण याबाबत फायनल घोषणा ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या म्हणजेच बोर्ड मिटिंगमध्ये केली जाईल. महत्त्वाचं म्हणजे वेदांताची पाच स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी झाल्यापासूनचा हा पहिला लाभांश असणार आहे. म्हणूनच कंपनीबाबत आणि डिविडेंडबाबत शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळे कंपनीकडून लाभांशाची घोषणा करताच, गुंतवणूकदारांनी खरेदी वाढवली आणि त्यामुळे शेअरमध्ये दमदार उसळी पाहायला मिळाली.
बाजार तज्ज्ञ आणि आर्थिक विश्लेषकांच्या मते, गुंतवणूकदारांना मोठा लाभांश देण्याची वेदांताची जुनी परंपरा कायम राहू शकते, मात्र यांच्या पद्धतीमध्ये थोडा बदल होऊ शकतो. आता वेदांताचा व्यवसाय पाच स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागला गेल्यामुळे, प्रत्येक कंपनीचा नफा आणि रोख प्रवाह वेगवेगळा असणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, भविष्यात या विभक्त कंपन्यांकडून मिळणारा डिविडेंड थेट जागतिक वस्तूंच्या किमतींवर जसे की धातू, तेल आणि वायू यांच्यावर अवलंबून असणार आहे. पूर्वी, एक संयुक्त कंपनी म्हणून वेदांता भरीव लाभांश देत असे. मात्र डीमर्जरनंतर, प्रत्येक व्यवसायाच्या स्वतःच्या विशिष्ट गरजा असणार आहेत. ज्यामुळे भविष्यात लाभांशाच्या रकमेत काही चढ-उतार होऊ शकतात.
जर तुम्ही वेदांताचे गुंतवणूकदार असाल, तर या बातमीचा तुमच्यासाठी अनेक अर्थ असू शकतात. जर तुम्हाला अंतरिम डिविडेंडचा लाभ घ्यायचा आहे तर, तुमच्या डिमॅट अकाऊंटमध्ये ठरवलेल्या रेकॉर्ड डेटपूर्वी शेअर्स असणं आवश्यक आहे. कारण कंपनीच्या नोंदींमध्ये नोंदणीकृत होण्याकरिता आणि कंपनीकडून मिळणाऱ्या डिविडेंडचा तुम्हाला फायदा मिळेल.
ही कंपनी पूर्वी वेदांता लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. त्यानंतर तिचे पाच कंपन्यांमध्ये विभाजन झाले:
वेदांता लिमिटेड (मूळ कंपनी/अस्तित्वात असलेली कंपनी, ज्यात हिंदुस्तान झिंक कंपनीचा समावेशही आहे)
वेदांता ॲल्युमिनियम मेटल लिमिटेड (ॲल्युमिनियम व्यवसाय)
वेदांता ऑइल अँड गॅस लिमिटेड (तेल आणि वायू व्यवसाय)
वेदांता पॉवर लिमिटेड (ऊर्जा व्यवसाय)
वेदांता आयर्न अँड स्टील लिमिटेड (लोहखनिज आणि पोलाद व्यवसाय)
( Desclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असल्याने, गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)






