रांची तिकीटांची काळाबाजारी (फोटो- सोशल मीडिया)
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, जो रांची येथील ‘झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन’ स्टेडियमबाहेरचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक उघडपणे आणि बिनधास्तपणे सामन्याची तिकिटे काळ्या बाजारात महागड्या दराने विकताना दिसत आहेत. थेट स्टेडियमच्या बाहेरच असा प्रकार सुरू असल्याने क्रिकेट चाहत्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सामन्याची तिकिटे अधिकृत खिडकीवर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नसताना, काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिकिटे आली कुठून? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. उघड्यावर सुरू असलेल्या या तिकिटांच्या काळ्या बाजारामुळे स्थानिक पोलीस प्रशासन आणि झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या सुरक्षेवर तसेच व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच या व्हिडिओमागचे सत्य नेमके काय आहे याचा तपास केला जावा अशी मागणी केली जात आहे. तपास झाल्यावरच या व्हिडिओचे सत्य सर्वांसमोर येण्यास मदत होऊ शकते.
रांची में 9 अक्टूबर को होने वाले भारत-वेस्टइंडीज क्रिकेट मैच के टिकटों की कालाबाजारी खुलेआम चल रही है। दिहाड़ी मजदूरों, रेजा-कुलियों और गरीब मजदूरों को लाइन में खड़ा कर टिकट खरीदवाए जा रहे हैं और फिर वही टिकट दोगुने-तिगुने दाम पर बेचे जा रहे हैं। लानत है ऐसी व्यवस्था पर, जहाँ कैमरे में सबकुछ कैद है, मीडिया में खबरें छप रही हैं, फिर भी रांची पुलिस की आँखों पर पट्टी बंधी है। लगता है बालू की अवैध कमाई में व्यस्त पुलिस को अब टिकटों की कालाबाजारी भी “सामान्य कारोबार” लगने लगी है। @HemantSorenJMM जी, राजधानी रांची में आपकी नाक के नीचे यह खुली लूट चल रही है और सरकार मौन है। सवाल उठना स्वाभाविक है कि क्या बालू की काली कमाई की तरह टिकटों की कालाबाजारी का हिस्सा भी ऊपर तक पहुँच रहा है? यह खेल सिर्फ टिकटों की कालाबाजारी नहीं, बल्कि आम क्रिकेट प्रेमियों के हक पर डाका है। हजारों लोग, जो अपने बच्चों और परिवार के साथ मैच देखने का सपना लिए बैठे थे, इस संगठित लूट के कारण स्टेडियम से बाहर रह जाएंगे। मुख्यमंत्री जी, अब भी समय है। संज्ञान लीजिए, दलालों पर कार्रवाई कीजिए और रांची पुलिस से पूछिए कि जब सबकुछ खुलेआम दिख रहा है, तो उन्हें दिखाई क्यों नहीं दे रहा? @BJP4India @narendramodi @AmitShah @NitinNabin @blsanthosh @BJP4Jharkhand @ANI @PTI_News @ians_india @ranchipolice — Babulal Marandi (@yourBabulal) October 6, 2026
समोर आलेल्या माहितीनुसार, या स्टेडियम भारत वेस्ट इंडिज सामन्याचे तिकीट 2000 रुपये आहे, ते तिकीट काळाबाजारी करून जवळपास 16 हजार म्हणजे तब्बल 8 पट जास्त किंमतीने विकले जात असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओमध्ये जे आहे त्याचा दावा ‘नवराष्ट्र’ करत नाही. मात्र असंख्य लोक अधिकृतपणे तिकीट काढण्यासाठी प्रतीक्षा करत असताना असा काळाबाजार होत असल्यास यावर कारवाई केली जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.






