फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Harmanpreet Kaur Education: हरमनप्रीत कौरने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कप्तानीचा राजीनामा देऊन आपल्या १४ वर्षांच्या कर्णधार पदाच्या प्रवासाला पूर्णविराम दिला आहे. या काळात तिने वेगवेगळ्या टप्प्यांवर संघाचे नेतृत्व केले आणि अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व केले. तिने कर्णधार पद सोडले असले तरी आपल्या सोशल मीडियावर टाकलेल्या भावूक संदेशात म्हटले की, कर्णधार म्हणून हरमनप्रीतचा काळ आता संपला आहे, परंतु एक खेळाडू म्हणून तिचा प्रवास सुरूच राहील. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आपण हरमनप्रीत कौरचे शिक्षण किती आहे? जाणून घेणार आहोत?
हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. तिचा जन्म ८ मार्च १९८९ रोजी पंजाबमधील मोगा जिल्ह्यात झाला. तिचे वडील हरमंदर सिंह भुल्लर हे स्वतः खेळाडू होते आणि त्यांनीच हरमनला क्रिकेटचे पहिले धडे दिले. तिची आई सतविंदर कौर गृहिणी आहेत. बालपणापासूनच हरमनच्या मनात क्रिकेटबद्दल प्रचंड क्रेझ होती आणि तिचे वडील तिचे पहिले कोच बनले.
हरमनने आपले शालेय शिक्षण मोगा येथे पूर्ण केले आणि नंतर ज्ञान ज्योती स्कूल अकादमीत प्रवेश घेऊन क्रिकेटचे प्रशिक्षण सुरू केले, तिथे तिला कोच कमलदीश सिंह सोधी यांचे मार्गदर्शन लाभले. २०१४ मध्ये ती मुंबईत स्थलांतरित झाली आणि भारतीय रेल्वेमध्ये नोकरीही सुरू केली.
हरमनप्रीतने २००९ ते २०११ या कालावधीत चौधरी चरण सिंह विद्यापीठातून दूरस्थ शिक्षणाद्वारे (डिस्टन्स एज्युकेशन) पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याआधी ती जालंधरच्या एका कॉलेजमध्ये शिकत होती, परंतु क्रिकेट स्पर्धा आणि परीक्षांच्या तारखा एकत्र आल्यामुळे तिला कॉलेज बदलावे लागले. तिने समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या विषयांमधून शिक्षण घेतले.
मात्र, २०१८ मध्ये तिच्या पदवीवर प्रश्न उपस्थित झाल्यावर तिला डीएसपी पदावरून हटवल्याचा विवादही झाला होता, परंतु तिने बचावात सांगितले की तिच्या सर्व पदव्या कायदेशीर आणि वैध आहेत.
हरमनप्रीतने मार्च २००९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर तिने जून २००९ मध्ये इंग्लंडविरुद्ध टी-२० पदार्पण केले. आज ती महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे आणि तिच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे.
हरमनप्रीतने आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games) भारतीय संघाला मोठी यश मिळवून दिले. तिच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दोन वेळा आशियाडचे सुवर्णपदक जिंकले. गेल्या महिन्यात निशिन येथे भारतीय संघाने दुसऱ्यांदा आशियाड गोल्ड आपल्या नावावर केले. कर्णधार म्हणून हरमनप्रीतचे हे शेवटचे मोठे यश ठरले.






