हवेली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा (फोटो- सोशल मिडिया)
१४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघांचे विजेतेपद
दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
दोन्ही विजेत्या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
देहू: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या विद्यमाने आणि संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहू यांच्या सहकार्याने आयोजित हवेली तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूच्या मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत १४ व १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद पटकावले. या दोन्ही विजेत्या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा देहू येथील संत तुकाराम महाराज क्रीडांगणावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो-खो खेळाडू पूर्वा वाघ व राष्ट्रीय खो-खो खेळाडू आकाश टकले यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी व आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री. जगन्नाथ लकडे, देहूच्या नगराध्यक्षा स्मिताताई चव्हाण, उपनगराध्यक्ष योगेशभाऊ काळोखे, मुख्याधिकारी चेतन कोंडे, मेघाताई सागर काळोखे उपस्थित होते.
पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
त्यासोबतच चैत्राली भसे, नारायण मोरे, पुरुषोत्तम महाराज मोरे, अजित मोरे, अविनाश भसे, गणेश मराठे, विकास कंद, वनिता देशकर, मुख्याध्यापिका श्रीमती निवेदिता पासलकर, सौ. विद्या कांबळे, सौ. स्वालेहा पठाण यांच्यासह रयत संकुल, देहू येथील शिक्षकवृंद व फिनिक्स क्रीडा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलींचे तब्बल ५५ संघ, तर दुसऱ्या दिवशी मुलांचे ५६ संघ स्पर्धेत सहभागी झाले.
१४ वर्षांखालील गटात संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूने प्रथम; भेकराई माता माध्यमिक विद्यालय, भेकराईनगर द्वितीय, तर हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय, फुलगाव तृतीय, १७ वर्षांखालील गटातही संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूने प्रथम क्रमांक पटकावला. ग्रामीण सर्वांगीण विकास माध्यमिक विद्यालय, कुंजीरवाडी द्वितीय, तर कन्या प्रशाला, लोणी काळभोरने तृतीय क्रमांक मिळवला.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात जोगेश्वरी माता विद्यालय, वाडेबोल्हाई प्रथम, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल द्वितीय, तर संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूने तृतीय क्रमांक मिळवला.
Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…
संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या विजेत्या संघांना क्रीडा मार्गदर्शक संदीप चव्हाण व सचिन दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका श्रीमती निवेदिता पासलकर यांनी खेळाडू, मार्गदर्शक व क्रीडा विभागाचे अभिनंदन केले. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या संघांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत मगर व सुनील घुमटकर यांनी केले, तर आभार सचिन दळवी यांनी मानले.






