लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव
AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा
विवो व्हि 80 भारतात 8GB+128GB, 8GB+256GB आणि 8GB+512GB या तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आहे. स्मार्टफोनच्या 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 62,999 रुपये, 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत 69,999 रुपये आणि 8GB+512GB व्हेरिअंटची किंमत 79,999 रुपये आहे. हा नवा स्मार्टफोन सनराइज अँथम, होराइजन ब्लू आणि स्टेलर ब्लॅक या रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन विवो इंडिया वेबसाईट, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ऑफलाईन स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोनची विक्री 13 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. मात्र या डिव्हाईसची प्री ऑर्डर सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य: Vivo)
कंपनी लाँच ऑफर अंतर्गत, निवडक बँक कार्डसाठी 10 टक्के कॅशबॅक ऑफर करणार आहे. याव्यतिरिक्त 10 टक्के एक्सचेंज बोनसचा फायदा देखील मिळणार आहे. ग्राहक नो कॉस्ट ईएमआय पर्यायावर देखील हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.
कंपनीने लाँच केलेल्या नव्या 6.59 इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनचे रिजोल्यूशन 2750×1260 पिक्सेल आहे आणि हा स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले 1.07 बिलियन कलर्स दाखवण्यासाठी सक्षम आहे आणि याची लोकल पीक ब्राइटनेस 5,000 निट्सपर्यंत आहे. फोनमध्ये 1.25mm पातळ बेजल देण्यात आले आहेत, ज्यामुळे स्क्रीन-टू-बॉडी रेशियो देखील मिळणार आहे.
परफॉर्मंससाठी विवो व्हि 80 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा 4-nm तंत्रज्ञानावर आधारित ऑक्टा-कोअर चिपसेट आहे, ज्याची अधिकतम क्लॉक स्पीड 2.8GHz आहे. ग्राफीक्ससाठी या डिव्हाईसमध्ये एड्रेनो 722 जीपीयू मिळणार आहे. फोनमध्ये 8GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे. विवोच्या एक्सटेंडेड रॅम सुविधेद्वारे अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम वापरण्याची सुविधा मिळणार आहे. स्टोरेजचे माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवण्याचा पर्याय मिळणार आहे.
विवो व्हि 80 स्मार्टफोनची विशेषत: म्हणजेच याची ZEISS कॅमेरा सिस्टिम आहे. फोनच्या मागील बाजूला तीन कॅमेरा सेटअप मिळणार आहे, ज्यामध्ये f/1.88 50MP ZEISS ओआयएस मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये सोनी लायटिया 700V सेंसर आणि ओआयएस सपोर्ट मिळणार आहे. यासोबतच f/2.65 50MP ZEISS नाईट टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये सोनी IMX882 सेंसर मिळणार आहे. हा कॅमेरा ओआयएससह 3x ऑप्टिकल झूम आणि 100x पर्यंत झूमला सपोर्ट करतो. तिसरा कॅमेरा f/2.2 8MP ZEISS अल्ट्रा-वाइड अँगल आहे, ज्याची फील्ड ऑफ व्यू 115 डिग्री आहे.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये f/2.0 50MP ZEISS ग्रुप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमेऱ्यात ऑटोफोकस आणि 92 डिग्री फील्ड ऑफ व्यू मिळणार आहे. फोन 4K सिनेमॅटिक व्हिडिओसह 4K 60fps व्हिडीओ रेकॉर्डिंगला देखील सपोर्ट करतो.
फोनमध्ये 7,200mAh बॅटरी दिली आहे, जी व्हि-सिरीजमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी क्षमता आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन सतत नेविगेशनमध्ये 14 तासांपर्यंत आणि लोकल व्हिडीओ प्लेबॅकमध्ये 39.5 तासांपर्यंत चालू शकतो. फोन चार्ज करण्यासाठी 90W फ्लॅशचार्ज सपोर्ट दिला आहे. डिव्हाईसची बॅटरी कमी वेळात चार्ज केली जाऊ शकते.
विवो व्हि 80 स्मार्टफोन भारतात अँड्रॉईड 17 आधारित ओरिजीनओएस 7 सह लाँच करण्यात आला आहे. विवो व्हि 80 हा व्हि-सिरीजचा पहिला स्मार्टफोन आहे, ज्याला ओरिजीनओएस 7 सह लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये एआयसंबंधित 30 पेक्षा जास्त क्रिएटिव टूल्स देखील देण्यात आले आहेत. ज्यामध्ये लाईव्ह स्टिकर कोलाज आणि एआय दिवाळी पोर्ट्रेट 2.0 सारख्या फीचर्सचा समावेश आहे.
फोनमध्ये ग्लास बॅक आणि 3D अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळणार आहे. डिव्हाईसला IP68 आणि IP69 रेटिंग मिळाली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, डुअल-बँड वायफाय, एनएफसी, आयआर ब्लास्टर आणि ब्लूटूथ 5.4 सह डुअल सिम सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये स्टीरियो स्पीकर्स देखील मिळणार आहेत.






