महापारेषणमध्ये तब्बल 2623 रिक्त जागांसाठी भरती; 31 जुलैपर्यंत करता येणार अर्ज!
राज्यातील प्रमुख वीज पारेषण कंपनी आणि राज्य सरकारच्या संपूर्ण मालकीच्या महापारेषण किंवा महाट्रान्सको या कंपनीमध्ये मोठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महापारेषणमध्ये तब्बल 2623 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या भरतीसाठी महापारेषणकडून अर्ज मागविण्यात आले असून, इच्छुक उमेदवारांनी तत्काळ अर्ज करावेत, असे आवाहन महापारेषणकडून करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 जुलै 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी.
रिक्त असलेले पद : विद्युत सहाय्यक
रिक्त पद संख्या : 2623 पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024
काय आहेत अटी व शर्ती?
महापारेषण किंवा महाट्रान्सको या कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष इतके असावे. याशिवाय उमेदवाराने जाहिरातीमध्ये दिलेली शैक्षणिक अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची १५० गुणांची ऑबेजक्टिव्ह स्वरूपात एक लेखी परीक्षा घेतली जाईल. ज्यासाठी दोन तासांच्या अवधी दिला जाईल. या परीक्षेच्या आधारावर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या जिल्हा केंद्रांवर होईल लेखी परीक्षा
अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर.
किती आहे परीक्षा शुल्क?
– खुल्या प्रवर्गातील उमेदवार : ५०० रुपये.
– BC, EWS, अनाथ उमेदवार : २५० रुपये
किती मिळणार वेतन?
दरमहा १५,००० ते १७,००० रुपये
कसा कराल अर्ज?
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या विद्युत सहाय्यक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी नोंदणी शेवटच्या तारखेअगोदर करायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 असणार आहे. नोंदणी झालेले ऑनलाईनअर्ज शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवडीकरीता विचारात घेण्यात येतील.
अधिक महितसाठी जाहिरात पहा : https://drive.google.com/file/d/1gVjrNcXigxtLYpqt7tJrzwpRnyIvCWHi/view
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा : https://www.mahatransco.in/index.php/career/active
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.mahatransco.in ला भेट द्या.






