मुंबईतील दीड दिवसाच्या गणपती विसर्जन झालेल्या शंभर ते दीडशे ट्रकमधील मूर्ती येथे विल्हेवाटीसाठी आणल्या गेल्या. हा सगळा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला आहे.
महापालिकेची पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना फसली असल्याचं दिसून येत आहे. शहरात लाखो रुपयांत कृत्रिम विसर्जन तलाव उभारले गेले; मात्र भाविकांनी त्याकडे पाठ फिरवली असल्याचं दिसत आहे.
समाजसेविका सरिता खानचंदानी यांनी त्यांच्या राहत्या घराच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
घोडबंदर रोड येथील वाहतूक कोंडीची समस्या आता वाढती डोकेदुखी ठरत आहे. याचपार्श्वभूमीवर परिसरातील रस्ता रुंदीकरणा प्रकल्प हाती घेण्यात येत होता, मात्र या रुंदीकरणास स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असतानाच, मूर्ती घेण्यासाठी गेलेल्या डोंबिवलीतल्या भाविकांना मंगळवारी धक्का बसला. मूर्तिकाराचा फोन बंद असून, कारखानाही बंद झाल्याचे त्यांना दिसून आले.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका, रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटी, एटॉस कंपनी व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
अधिकृत समितीचं नाव “नौपाडा आणि कोपरी प्रभाग समिती” असतानाही त्या पत्रकातून ‘कोपरी’ हा शब्द पुसून टाकण्यात आला. हा प्रकार उघड होताच कोपरीकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
भाजपा व शिंदे गटाच्या प्रभावाखाली ही प्रभाग रचना केली गेल्याचा स्पष्ट आरोप ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख समीर भगवान यांनी केला. याबाबत ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला इत्यंभूत माहिती देणारे पत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले.
अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी, दिवा आणि मुंब्रा या भागावर देखरेख करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष पथक निर्माण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.