Get live and latest Politics News in Marathi: Navarashtra covers all the latest Politics news in Marathi. Get daily Trending Politics News in Marathi language.,राजकीय बातम्या, राजकारण : ताज्या मराठी बातम्या at Navarashtra.com
शिवसेनेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना भाजपने पक्षात घेतल्याने शिंदे गटातील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यातच एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्कार घातला होता.
नितीश कुमार मुख्यमंत्री झाले असले तरी देखील बिहारच्या राजकारणात भाजपची पकड दिसून येत आहे. गुरुवारी नितीश कुमार यांच्यासोबत 26 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस, राजर्षी शाहू आघाडी आणि भाजप या तीन प्रमुख पॅनेलसह अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने प्रत्येक प्रभागात बहुरंगी लढतीची चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी पक्षीय उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवार कडवी टक्कर देतील.
विरोधात राहून लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही, मोर्चे काढता येतात, आंदोलनं करता येतात. आता गेले तीन-चार वर्षे इथे अधिकारीच टिकत नाही. माझ्याकडे प्रत्येक अधिकारी तीन वर्षे टिकतो.
Local Body Election: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या.निवडणूका ऐन उंबऱ्यावर येऊन ठेपल्या असताना मतदार यादीत सावळा गोंधळ झाल्याचं समोर आलं.
आगामी माळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रचाराचा भव्य शुभारंभ शनिवारी (दि.२२) श्री भैरवनाथ महादेवाच्या दर्शनाने आणि अभिषेकाने मंगल वातावरणात झाला.
महागठबंधनला यंदाच्या निवडणुकीत केवळ 35 जागा जिंकता आल्या. तेजस्वी यादव, राहुल गांधी यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. मात्र महागठबंधनच्या नेत्यांना गर्दीचे रूपांतर मतदानात करता आले नाही.
प्रभाग क्रमांक 15 कडे बारामतीकरांचे विशेष लक्ष लागले आहे. कारण या प्रभागात माजी नगराध्यक्ष सुनील पोटे यांचे चिरंजीव यशपाल पोटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होताना दिसण्याची शक्यता आहे. पण राज ठाकरे यांना सोबत घेणं हे काँग्रेसच्या मुंबईतील काही नेत्यांना मान्य नाही.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. डिसेंबर महिन्यात 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला निकाल जाहीर होणार आहे.
Loha Nagarparishad Election : राज्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. असे असताना भाजपानेच एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी देण्याचा अजब प्रकार केल्याचं समोर आले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने एकला चलो रे चा नारा दिला आहे. यानंतर राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये नवीन युती होण्याची देखील शक्यता आहे.