Vasai Virar News : वसई-विरार शहरात २०२२ ते २०२५ या कालावधीत मंजूर झालेल्या ८० हून अधिक पुनर्विकास प्रकल्पांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त FSI दिल्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या फेरतपासणीत उघडकीस आला आहे.
Vasai Virar Municipal Corporation Decision : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि कचरा फेकणाऱ्या नागरिकांना चाप लावण्यासाठी वसई-विरार महापालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंत्राटदारांमार्फत क्लीनअप मार्शल नियुक्त करण्याची पारंपरिक पद्धत बंद केली. ही धुरा तृतीयपंथी आणि महिला बचत गटां...
Vasai Virar Garbage Scam : वसई-विरार महापालिकेच्या भोयदापाडा-गोखिवरे येथील कचरा प्रक्रिया आणि बायो-मायनिंग प्रकल्पात तब्बल ६४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी केला आहे.
Vasai Virar Garbage Scam : वसई-विरार शहरातील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी देण्यात आलेल्या ९५७.६४ कोटी रुपयांच्या ५ वर्षांच्या कंत्राटावरून महासभेत जोरदार खडाजंगी झाली. अपुरे मनुष्यबळ, वाहनांची कमतरता आणि कचऱ्याच्या वजनात गैरव्यवहार करून बिले काढल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
Gokulashtami 2026: गोकुळाष्टमीनिमित्त वसईतील चित्रकार कौशिक जाधव यांचे शिष्य जय कल्पेश शहा यांनी अनोख्या पद्धतीने श्रीकृष्णाला कलेतून अभिवादन केले आहे. जयने चक्क बासरीवर वॉटर कलर्सच्या माध्यमातून श्रीकृष्णाचे सुंदर चित्र साकारले. अवघ्या एका तासात पूर्ण केलेल्या या कलाकृतीत कला, कल्पकता आणि कृष्ण...
Vasai Virar Water Tax Hike : वसई-विरार शहरात अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर झाली असताना, महापालिकेने केलेली पाणीपट्टी करवाढ मागे घेण्याच्या मागणीवरून महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
Vasai News: वसई तालुक्यातील मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारोळ गावात मुंबई-अहमदाबाद स्कायवॉक ब्रिजजवळील निर्जनस्थळी संशयास्पद पूजेचे साहित्य आढळल्याने खळबळ उडाली आहे. साहित्याजवळ सापडलेल्या एका वाळलेल्या पानावर ‘कुणाल किशोर वाघेला’ असे नाव लिहिलेले दिसून आल्याने स्थानिकांमध्ये विविध चर्चा सुर...
Vasai Virar Roads : वसई-विरार शहरात दरवर्षी रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण आणि खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. तरीही नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. वर्षाला कोट्यवधींचे तात्पुरते 'पॅचवर्क' करण्यापेक्षा महापालिका आणि MMRDA ने कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीट रस्त्य...
Vasai Virar News : वाढती महागाई, मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या बोजापासून एकाकी निराधार ज्येष्ठ महिलांना दिलासा देण्यासाठी वसई-विरार महापालिकेने अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
Vasai Sand Mafia : वैतरणा खाडीपात्रात सक्शन पंपाच्या साहाय्याने सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने अचानक धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत वाळू उपसा करणारी सक्शन बोट उद्ध्वस्त करण्यात आली.
Vasai Road : वसंत नगरी ते वसई पूर्व-पश्चिम पुलाच्या रस्त्याच्या जीवघेण्या दुरवस्थेवर आमदार स्नेहा दुबे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर वसई-विरार महापालिका प्रशासनाने दुरुस्तीचा संपूर्ण खर्च 'रिस्क अँड कॉस्ट' तत्त्वावर वसूल करण्याची कारवाई सुरू केली आहे.
Vasai Environment Conservation : वसईचे निसर्गसौंदर्य, समृद्ध पर्यावरण आणि पारंपरिक गावपण टिकवण्यासाठी आता महिला शक्ती संघटितपणे मैदानात उतरली आहे. निर्मळ येथील समाज सेवा मंडळात आयोजित 'नवज्योती महिला मंडळाच्या' मेळाव्यात २५० हून अधिक महिला प्रतिनिधींनी सहभागी झाल्या होत्या.