कात्रज घाटातील तीव्र उतार, न्यूट्रलवर वाहन चालवू नये, वेग नियंत्रणात ठेवावा, अशा मार्गदर्शन सूचना मोटार वाहन निरीक्षकांकडून चालकांना दिल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटेट) २०२५ चे आयोजन येत्या २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्ह्यांमध्ये करण्यात आले आहे. यावेळी परीक्षेसाठी एकूण १ हजार ४२३ परीक्षा केंद्रांची व्यवस्था केली गेली गेली आहे.
Ladki Bahin Yojana : पात्र महिलांना पती आणि वडील दोन्ही नसल्यामुळे अशा महिलांना ई-केवायसी करताना मोठ्या अडचणी येत होत्या. यावर आता राज्य सरकारकडून तोडगा काढण्यात आला आहे.
पणजी (गोवा) येथे जागतिक मराठी अकादमी आयोजित 'शोध मराठी मनाचा' या भव्य जागतिक संमेलनाचे ९ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस शहरातील तापमानात सौम्य वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारठवणाऱ्या थंडीपासून पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
पुणे एसटी विभागात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत फुकटे प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात १७ फुकटे प्रवासी आढळून आले.
'निसर्गोपचार ही केवळ उपचारपद्धती नसून निसर्ग आणि माणूस यांच्या समतोलातून घडणारी जीवनशैली असल्याचे मत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक खाद्य महोत्सवाचा समारोपात व्यक्त केले.
Pune Petrol Pump Strike : पुण्यातील पेट्रोल पंप हे आज (दि.19) सायंकाळी सातनंतर बंद असणार आहेत. पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुणेकरांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे.
माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळला जात आहे. भोर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आपले वर्चस्व राखण्यासाठी भाजपचा झेंडा आता नव्याने फडकवण्याची जोरदार तयारी केली आहे.
शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर कोळसा, जैविक पदार्थ, प्लास्टिक, रबर किंवा कचरा जाळून शेकोटी करून हवा प्रदुषण केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.
पुण्यातील एका जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडले असून, मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.