जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे व उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जनआक्रोश आंदोलन करत – MSIDC व कंत्राटदाराला जाहीर इशारा दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळत आहे्. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी पाहणी दौरा केला आहे.
आषाणे येथे असलेल्या धबधबा येथे आलेल्या तरुणांच्या ग्रुप मधील एक तरुण डोंगरावरून खाली कोसळला होता.दैव बलवत्तर म्हणून हा तरुण झाडीमध्ये कोसळला. ग्रामस्थांच्या मदतीने .त्याला बाहेर काढण्यात यश आलं आहे.
पनवेल डान्सबार तोडफोड प्रकरणामध्ये १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा होत असल्याचं दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे कोलेटी गावाजवळ शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एसटी व ट्रकचा अपघात झाल्याने ट्रक चालकाच्या जीवावर बेतलं आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या एक वर्षात फक्त १९ पुरुषांनीच नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. याच कालावधीत ५८२० महिलांनी शस्त्रक्रिया करून घेतली आहे. पुरुष नसबंदीचे हे प्रमाण केवळ ०.३२ टक्के आहे.
रायगडमधील पेण तालुक्यात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी नागरिकांना केले आहे.
कर्जत नगरपरिषद आणि पोलिस प्रशासन यांच्या माध्यमातून कर्जत चार फाटा तसेच श्रीराम पुल पर्यंत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्याच्या मधोमध बॅरिकेट्स बसविले जात आहेत.
Kokan Rain: रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणकिनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरु आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.