Sambhajinagar House Burglary : कुटुंबासह पुण्याला गेले अन् चोरट्यांनी घर फोडले; सोन्या-चांदीसह १.४५ लाखांचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगरच्या सिडको एन-५ परिसरात चोरट्यांनी बंद घर आणि कार्यालयाला लक्ष्य केले. पुण्याला गेलेल्या लिगल मॅनेजरच्या घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि ४० हजार रुपये रोख असा १ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
Sambhajinagar House Burglary फोटो सौजन्य AI
Sambhajinagar House Burglary फोटो सौजन्य AI Sambhajinagar House Burglary फोटो सौजन्य AI
Published on: 
Updated on: 
  • कोकणे हे एका खासगी फायनान्स कंपनीत लिगल मॅनेजर म्हणून कार्यरत

  • मुलाला फोन करून चोरीची माहिती दिली

  • कार्यालयातून १० हजारांचा ऐवज चोरीला

Sambhajinagar House Burglary : छत्रपती संभाजीनगरच्या सिडको एन-५ परिसरात चोरट्यांनी बंद घर आणि कार्यालयाला लक्ष्य केले. पुण्याला गेलेल्या लिगल मॅनेजरच्या घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि ४० हजार रुपये रोख असा १ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्याच परिसरातील दुसऱ्या कार्यालयातूनही रोख रक्कम आणि मोबाइल असा १० हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. या दोन्ही घटनांप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर कुटुंबासह पुण्याला गेलेल्या लिगल मॅनेजरचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि ४० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सिडको एन-५ येथील सानेगुरुजी हाउसिंग सोसायटीत ही चोरी झाली. त्याच परिसरातील मिलननगर येथील एका कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ हजार रुपये रोख आणि मोबाइल असा १० हजारांचा ऐवजही चोरून नेला. या दोन्ही चोरीच्या घटना २० ते २१ नोव्हेंबरदरम्यान घडल्याचे समोर आले आहे.

कोकणे हे एका खासगी फायनान्स कंपनीत लिगल मॅनेजर म्हणून कार्यरत

प्रकरणात बळवंत पुंडलिक कोकणे (४४, रा. प्लॉट क्रमांक १८१, सी/४, सानेगुरुजी हाउसिंग सोसायटी, एन-५, सिडको) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, कोकणे हे एका खासगी फायनान्स कंपनीत लिगल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. २० नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता ते पत्नी आणि मुलांसह घराला कुलूप लावून खासगी कामानिमित्त पुण्याला गेले होते.

मुलाला फोन करून चोरीची माहिती दिली

संधी साधत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी-कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, ५.५ ग्रॅमचे दोन सोन्याचे कानातले, एक ग्रॅमची सोन्याची ज्योती, एक ग्रॅमची अंगठी, तीन ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, चार ग्रॅमच्या सोन्याच्या बाळ्या, तीन ग्रॅमचे सोन्याचे वेल आणि तीन ग्रॅमचे पेंडल असा सोन्याचा ऐवज चोरून नेला. यासोबत २१ भार वजनाची चांदीची गणपती मूर्ती, २० भार वजनाचे चांदीचे कडे, वाळे व बाजुबंद आणि ४० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० सुमारास कोकणे यांच्या आई द्रौपदाबाई यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी तातडीने मुलाला फोन करून चोरीची माहिती दिली. कोकणे दाम्पत्य पुण्याहून निघून सायंकाळी साडेसात वाजता घरी पोहोचले. घरात पाहणी केली असता सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

कार्यालयातून १० हजारांचा ऐवज चोरीला

त्याच परिसरातील मिलननगर, गुलमोहर कॉलनी, एन-५ येथील मनोज बालाराम अग्रवाल यांच्या कार्यालयातही चोरी झाल्याचे समोर आले. चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आठ हजार रुपये रोख आणि मोबाइल असा सुमारे १० हजारांचा ऐवज चोरून नेला. प्रकरणात दोन्ही घटनांप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार बंडुदास खिल्लारे करित आहेत.