नीट परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश; 1563 विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा!

NEET Grace Marks : सर्वोच्च न्यायालयात आज झालेली सुनावणीदरम्यान, नीटच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 1563 विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क रद्द करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी असणार आहे.
Supreme Courts Big Order on NEET Exam 1563 students re-examed
Published on: 
Updated on: 

नीट परीक्षेच्या निकालानंतर त्याबाबत दाखल झालेल्या याचिकांवर आज (ता.१२) सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी ग्रेस मार्क्स मिळवणाऱ्या 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याचा आदेश सर्वोच्च न्यालयालाने दिला आहे. याबाबत आपण यापुढेही समुदेशन करणे थांबवणार नाही.असेही सर्वोच्च न्यायालयाने या निकालावेळी याबाबत आदेश देताना म्हटले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली असून, यावर पुढील दोन आठवड्यात उत्तर मागवण्यात आले आहे. याबाबतची पुढील सुनावणी ही 8 जुलै रोजी होणार आहे.

एनटीएकडून वाढीव गुणांबाबत युक्तिवाद

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर नीट युजी प्रकरणी ही सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेतील हेराफेरीच्या आरोपांनंतर ही परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीदरम्यान, नीट परीक्षेचे आयोजन करणाऱ्या एनटीएकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वाढीव गुणांबाबत युक्तिवाद करण्यात आला. यावेळी सुनावणीदरम्यान ग्रेस मार्क्स मिळवणाऱ्या 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही

याबाबत सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. याप्रकरणी आपले समुपदेशन सुरूच राहणार असून, आपले ते थांबवलेले नाही. जेव्हा परीक्षा असते, तेव्हा सर्वकाही पूर्णतेने केले जाते. अशा परिस्थितीत, परीक्षा पूर्णपणे रद्द करणे योग्य नाही, अशी टिप्पणीही सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी केली आहे.

केंद्रीय समितीचा युक्तीवाद

दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीने याप्रकरणी युक्तिवाद करताना सरकारच्या वकिलांनी म्हटले आहे की, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या चार सदस्यीय समितीने 1500 हून अधिक मुलांची फेरपरीक्षा घेण्याबाबत सुचवले आहे. किंवा मग हे विद्यार्थी फेरपरीक्षेला बसले नाही त्यांचे ग्रेस मार्क्स काढून टाकण्याचा विचार केला जाऊ शकतो, असेही केंद्राच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे.

काय म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाने?

याचिकर्त्यांना दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, तुमची मागणी एनटीएने मान्य केली आहे. ग्रेस मार्क काढून टाकण्यात येणार आहे. किंवा मग ग्रेस मार्क प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभाही सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. अर्थात या परीक्षेत ग्रेस मार्क्स न मिळालेलेच विद्यार्थी पात्र असणार असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे. दरम्यान, एनटीएने याबाबत म्हटले आहे की, 23 जून रोजी पुन्हा परीक्षा 1563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होईल.