फोटो सौजन्य: Freepik
एक छोटीशी आग थोड्या वेळात किती रौद्र रूप धारण करू शकते, हे आपण सर्वेच जाणतो. हल्ली कधी, कुठे आणि केव्हा आग लागेल हे सांगता येत नाही. गॅस सिलेंडर असो वा गुंतागुंतीची वायरिंग, आपल्या सर्वांच्याच घरी असे कित्येक अग्नी प्रज्वलित करणाऱ्या गोष्टी असतात ज्यामुळे आपल्या घरात आगीचा भडका उडू शकतो.
घराला आग लागणे ही एक गंभीर परिस्थिती असू शकते, ज्यामुळे केवळ मालमत्तेचे नुकसान होत नाही तर जीवाला देखील धोका होऊ शकतो. त्यामुळेच आपल्या सुरक्षिततेसाठी पुढील गोष्टी प्रत्येक घरात असणे अत्यंत महत्वाचे आहे.
फायर अलार्म आणि स्मोक डिटेक्टर हे अग्निसुरक्षेसाठी सर्वात मूलभूत आणि आवश्यक गॅझेट आहेत. तुम्ही हे गॅझेट मोठमोठया इमारतीत किंवा मॉलमध्ये पहिले असेल. हे उपकरण धूर किंवा आगीची लक्षणे लवकर ओळखतात आणि लगेच अलार्म वाजवून घरातील सदस्यांना सावध करतात. तुमच्या घराच्या प्रत्येक खोलीत, विशेषतः बेड रम आणि स्वयंपाकघरात स्मोक डिटेक्टर असणे गरजेचे आहे.
हे आणखी एक आवश्यक उपकरण आहे जे प्रत्येक घरात असले पाहिजे. यामुळे आग लागल्यास लगेच तुम्ही ती विझवू शकता. अग्निशामक उपकरण स्वयंपाकघर, गॅरेज आणि इतर संभाव्य धोकादायक ठिकाणी ठेवावीत. हे उपकरण आग लवकर विझवते आणि इलेक्ट्रिकल फायरविरूद्ध लगेच कार्य करते. त्यातही इलेक्ट्रिकल फायर पाण्याने विझवता येत नसल्याने फायर एक्सटिंग्विशरचे महत्त्व लक्षणीय वाढते.
फायर ब्लँकेट हा एक विशेष प्रकारचा ब्लँकेट आहे जो आगीचा प्रसार रोखण्यास यशस्वीरित्या मदत करतो. याचा वापर आग विझवण्यासाठी किंवा आग रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. हे विशेषतः स्वयंपाकघरात ठेवणे खूप फायदेशीर आहे, जेथे लहान आगीच्या घटना सतत घडत असतात. कपड्यांना आग लागल्यास, ब्लँकेट अंगावर झाकून आग विझवता येते.
आगीच्या घटनांमध्ये शरीराला दुखापत किंवा भाजण्याची घटना घडू शकते. म्हणून, घरी एक व्यवस्थित प्रथमोपचार किट ठेवणे फार महत्वाचे आहे. त्यात पट्टी, अँटीसेप्टिक क्रीम, बर्न क्रीम, गॉझ पॅड आणि इतर आवश्यक गोष्टी असाव्यात. प्रथमोपचार किट नेहमी तुमच्या आवाक्यात असावे जेणेकरुन अचानक प्रसंगी ते ताबडतोब वापरता येईल.
कार्बन मोनोऑक्साइड हा एक घातक वायू आहे जो आगीच्या वेळी अधिक प्रमाणात तयार होऊ शकतो. हा वायू गंधहीन असतो त्यामुळे तो शोधणे सुद्धा कठीण आहे. त्यामुळेच कार्बन मोनॉक्साईड डिटेक्टर या घटक वायूची गळती ओळखतो आणि लगेच अलार्म वाजवतो, जेणेकरून आपल्याला धोका वेळीच टाळता येऊ शकतो.






