Farmer Tour 2026 : महाराष्ट्रातील 180 शेतकऱ्यांना मिळणार परदेश दौऱ्याची संधी ! 4 कोटींचा खर्च, कृषी विभागाचा मोठा निर्णय
Farmer Tour 2026 : महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती असताना राज्य सरकारने 180 शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या दौऱ्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 34 जिल्ह्यांतून प्रत्येकी पाच शेतकऱ्यांची, म्हणजेच 170 निवडले जाणार, 10 शेतकरी राज्यस्तरीय समिती मार्फत निवडले जातील.