पुण्यात एफडीएची धडक कारवाई (फोटो- ai gemini)
मिथेनॉलप्रकरणी पुणे विभागातील ४३ कंपन्यांवर कारवाई
विषारी दारूमुळे १९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मिथेनॉलशी संबंधित कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे विभागातील मिथेनॉलशी संबंधित सर्व १०२ परवानाधारक कंपन्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ४३ कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २८ कंपन्यांचे परवाने निलंबित, तर १५ कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
विषारी दारूच्या घटनेनंतर राज्यभर मिथेनॉलशी संबंधित कंपन्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. राज्यात मिथेनॉलशी संबंधित सर्वाधिक कंपन्या पुणे विभागात असल्याने गेल्या चार महिन्यांपासून या कंपन्यांच्या कामकाजाची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार विभागातील सर्व १०२ परवानाधारकांची तपासणी पूर्ण झाली आहे.
Ans: एफडीएने केलेल्या कारवाईत ९ हजार किलो पनीर जप्त करण्यात आले आहे.
Ans: एफडीएने पुण्यात मार्केट यार्ड, बावधन, कसबा पेठ आणि बिबवेवाडी परिसरात कारवाई केली आहे.






