शिवसेना नेते संजय निरुपम (फोटो- सोशल मिडिया)
तरुणांच्या आंदोलनांचा संदर्भ देताना निरुपम यांनी नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततांविरोधात झालेल्या आंदोलनाचा उल्लेख केला. कॉक्रोज जनता पार्टीचे (सीजेपी) अभिजीत दीपके आणि अन्य कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर आंदोलन उभे केले होते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न असल्याने या आंदोलनाला विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांचा व्यापक पाठिंबा मिळाला. मात्र, या आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या विरोधात राजकीय आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या जनसमर्थनात घट झाल्याचे निरुपम यांनी सांगितले.
SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
दरम्यान, संजय राऊत यांच्या राजकीय वक्तव्यांवर टीका करताना निरुपम म्हणाले, सार्वजनिक जीवनात बोलताना प्रत्येकाने विचारपूर्वक आणि तथ्यांच्या आधारावर भूमिका मांडली पाहिजे. निराधार आरोप आणि सनसनाटी वक्तव्यांमुळे संबंधित नेत्याच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो.
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद करत निरुपम यांनी समाजातील तरुणांचे रोजगार, आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांचे प्रश्न दुर्लक्षित करता येणार नसल्याचे सांगितले. मराठा आरक्षण आंदोलनामागील अस्वस्थता समजून घेऊन त्यावर ठोस तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मुंबईत मराठी भाषेचा सन्मान राखला जावा आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा, अशी भूमिका निरुपम यांनी मांडली. मोठ्या कंपन्यांच्या वाढत्या प्रभावामुळे छोट्या व्यावसायिकांसमोर आव्हाने निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. पॅकेज्ड दुधाच्या कंपन्यांच्या विस्तारामुळे स्थानिक दूध विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत छोट्या व्यावसायिकांच्या संरक्षणाची गरज त्यांनी अधोरेखित केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा संदर्भ देत निरुपम यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. हिंदुत्व आणि काँग्रेसविरोध ही बाळासाहेबांच्या राजकारणाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेमुळे उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि बाळासाहेबांच्या विचारधारेपासून फारकत घेतली, असा आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळे होण्याचा घेतलेला निर्णय हा बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेण्याच्या दिशेने उचललेले पाऊल असल्याचेही निरुपम म्हणाले. त्यांच्या या भूमिकेवर संबंधित राजकीय पक्षांची वेगवेगळी मते आहेत.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांबाबत बोलताना निरुपम यांनी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, पदवीधरांचे रोजगारविषयक प्रश्न आणि स्थानिक समस्या समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधणे आवश्यक आहे. शिक्षांचा आमदार शिक्षक हवा आणि निवडणुकांमध्ये वैयक्तिक संपर्क, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बांधणी आणि समन्वय यांना विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.
Ans: संबंधित व्यक्तींनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या विरोधात राजकीय आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या जनसमर्थनात घट झाल्याचे निरुपम यांनी सांगितले.
Ans: तरुणांचे रोजगार, आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांचे प्रश्न दुर्लक्षित करता येणार नसल्याचे निरुपम यांनी सांगितले.






