iPhone Fold ची पहिली झलक आली समोर! 7.8 इंच स्क्रीन आणि A20 Pro चिपसेटने जिंकले यूजर्सचे मन, सोशल मीडियावर Video Viral
Samsung ने घेतला मोठा निर्णय! लवकरच बंद करणार ‘हे’ मेसेजिंग अॅप; काय आहे कारण? वाचा सविस्तर
असं सांगितलं जात आहे की, AppleTrack अकाऊंटवर शेअर केलेला व्हिडीओ केवळ आगामी फोल्ड आयफोनची संभाव्य डिझाइन असू शकते. मात्र ही डिझाईन यूजर्सना प्रचंड आवडली आहे. फोल्डेबल आयफोनच्या पहिल्या झलकने यूजर्सना आनंदीत केले आहे, यात काही शंकाच नाही. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, हे डिव्हाईस आयफोन फोल्ड किंवा आयफोन अल्ट्रा या नावाने लाँच केले जाऊ शकते. जरी आतापर्यंत सॅमसंगसारखे ब्रँड या विभागात खूप पुढे असले तरी, ऍपलचे हे पाऊल बाजारात मोठा बदल घडवून आणू शकते. (फोटो सौजन्य – X)
शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओवरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, अॅपलचा फोल्डेबल आयफोन बुक-स्टाइल डिझाईनसह लाँच केला जाऊ शकतो. डिव्हाईसमध्ये 7.8 इंच मोठा इनर OLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. हा आयफोन पूर्ण ओपन केल्यानंतर टॅब्लेट सारखा अनुभव देणार आहे. फोनचा एक्सटर्नल डिस्प्ले 5.5 इंच OLED पॅनल असू शकतो. त्यामुळे यूजरना फोन न उघडताही ते सहजपणे वापरता येईल. या आगामी डिव्हाईसमध्ये लिक्विड मेटल हिन्ज मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे डिव्हाईस आणखी मजबूत आणि टिकाऊ बनू शकते. याशिवाय आगामी डिव्हासईमध्ये टाइटेनियम फ्रेम आणि ग्लास/सिरेमिक बॅक मिळू शकते. या डिव्हाईसमध्ये फेस आयडी ऐवजी टच आयडी मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे डिव्हाईस आणखी पातल दिसणार आहे. दोन्ही स्क्रीनवर पंच-होल कॅमेरा डिझाइन आढळून येते.
This is the iPhone Fold rumored design. Would you buy one? pic.twitter.com/rmKfYCrKos — AppleTrack (@appltrack) April 4, 2026
पावरफुल फोल्डेबल आयफोनमध्ये अॅपलचे नवीन A20 Pro चिपसेट मिळण्याची शक्यता आहे, जे 2nm प्रोसेसवर आधारित असणार आहे. यामुळे डिव्हाईस अधिक चांगली स्पीड आणि बॅटरी एफिशिएंसी ऑफर करणार आहे. डिव्हाईसमध्ये 12GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर या डिव्हाईसमध्ये 5400mAh ते 5800mAh बॅटरी मिळू शकते. हे डिव्हाईस केवळ eSIM सपोर्टसह लाँच केले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच यामध्ये फिजिकल सिम स्लॉट दिला जाणर नाही. फोल्ड आयफोनमध्ये चार कॅमेरे दिले जाऊ शकतात. मागील कॅमेऱ्यामध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा असण्याची शक्यता आहे. सेल्फी कॅमेऱ्याबद्दल माहिती नसली तरी, त्यात एक नवीन सेंटर-पोझिशन सेन्सर असण्याची अपेक्षा आहे.
रिपोर्ट्सनुसार, फोल्ड आयफोन $2000 ते $2400 म्हणजेच सुमारे 1.85 लाख ते 2.24 लाख रुपयांच्या किंमतीत लाँच होऊ शकतो.






