Tech Tips: छोटासा तडा, पण नुकसान मोठं! स्मार्टफोनवर अजूनही तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरताय? होऊ शकतं मोठं नुकसान
काहीवेळेस फोन पडला किंवा एखाद्या टोकदार वस्तूवर आदळला तर टेम्पर्ड ग्लासमध्ये क्रॅक पडू शकतात किंवा ग्लास तुटू शकते. टेम्पर्ड ग्लासमध्ये क्रॅक पडल्यानंतर किंवा ग्लास तुटल्यानंतर देखील काही लोकं त्याचा वापर करतात. तुम्ही देखील असंच करत आहात का? तर वेळीच सावध व्हा. कारण तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर केल्यास फोनच्या स्क्रीनच्या सुरक्षेवर परिणाम होतो. तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर केल्यास स्मार्टफोनवर कसा परिणाम होऊ शकतो, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: istock)
टेम्पर्ड ग्लासचे मुख्य काम मोबाईलच्या डिस्प्लेला स्क्रॅच आणि झटक्यांपासून वाचवण्याचे आहे. जेव्हा ग्लासमध्ये तडा जातो, त्यानंतर त्याची मजबुती कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत, फोन पुन्हा पडल्यानंतर किंवा त्याला जोरात झटका लागल्यानंतर डिस्प्लेला नुकसान पोहोचू शकते. तुटलेले टेम्पर्ड ग्लास काही प्रमाणात सुरक्षितता देऊ शकतो, मात्र तो पूर्वीइतक्याच पातळीवरील संरक्षणाची खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर करणं टाळा.
तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर करण्याचे दुसरे मोठे नुकसान म्हणजेच तीक्ष्ण आणि बाहेर आलेल्या कडा. तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासमधून काचेचे छोटे तुकडे बाहेर आल्यास फोनचा वापर करताना ते काचेचे तुकडे तुमच्या बोटांना लागू शकतात, यामुळे तुम्हाला इजा होऊ शकते.
तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर केल्याने केवळ स्क्रीनची सुरक्षा कमी होत नाही तर यामुळे मोबाईलच्या टचस्क्रीनवर देखील परिणाम होऊ शकतो. टेम्पर्ड ग्लासचा एखादा भाग निघाला असेल किंवा डिस्प्लेवर दबाव टाकत असेल तर टचस्क्रीनचा वापर करण्यात अडचण येऊ शकते. यामुळे स्क्रीनवरील टच रिस्पॉन्स खराब होऊ शकतो. तसेच स्क्रीनवर लाईन दिसत असतील, किंवा डिस्प्लेमध्ये इतर कोणतीही समस्या असेल, तर फोन तपासून घ्या. तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर केल्याने तुमच्या फोनचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे नेहमी चांगल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर करा. यामुळे फोनची सुरक्षा वाढते.
Ans: टेम्पर्ड ग्लासला तडा गेला असेल किंवा तो तुटला असेल, तर शक्य तितक्या लवकर तो बदलून घ्यावा.
Ans: नाही. तुटलेल्या ग्लासच्या तीक्ष्ण कडांमुळे बोटांना इजा होऊ शकते आणि स्क्रीनचे संरक्षणही कमी होऊ शकते.
Ans: होय. तुटलेला टेम्पर्ड ग्लास पूर्वीसारखे संरक्षण देईलच असे नाही. त्यामुळे फोनला पुन्हा जोराचा धक्का लागल्यास स्क्रीनचे नुकसान होऊ शकते.






