BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा अनोखा खेळ! पुन्हा घेऊन आली फ्रीडम प्लॅन, केवळ 1 रुपयांत मिळणार बरंच काही
भारत संचार निगम लिमिटेडने पुन्हा एकदा 1 रुपयांच्या प्लॅनची घोषणा केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत घोषणा देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आता अधिकृतपणे कंपनीचा फ्रीडम प्लॅन परतला आहे, असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही. यूजर्सना 1 रुपयांच्या फ्रीडम प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. तसेच कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नेशनल रोमिंगची सुविधा देखील ऑफर केली जाणार आहे. त्यामुळे यूजर्ससाठी कंपनीचा हा प्लॅन अतिशय फायदेशीर ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Freedom is back at just ₹1!
Simple. Reliable. Affordable#bsnl #freedomplan #1rupeeoffer #freesim @CMDBSNL @robertravi21 pic.twitter.com/9I2J1maJ2O — BSNL India (@BSNLCorporate) April 11, 2026
बीएसएनएल कंपनीने एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, 1 रुपयांच्या फ्रीडम प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2GB डेटा बेनिफिट्स आणि 100 फ्री एलएमएसचा लाभ देखील मिळणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडचा हा फ्रीडम प्लॅन नव्या यूजर्ससाठी लाँच करण्यात आला आहे. जर एखाद्या यूजरने दुसऱ्या ऑपरेटरकडून बीएसएनएलमध्ये आपल्या नंबरचा MNP केला, तरच त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
भारत संचार निगम लिमिटेड सतत यूजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. या प्लॅन्सची खासियत म्हणजे कमी किंमत आणि फायदे जास्त. याशिवाय कंपनी त्यांचे मोबाईल नेटवर्क अधिक चांगले करण्यासाठी देखील सतत प्रयत्न करत आहे. अलीकडेच बीएसएनएलने सुमारे 1 लाख नवीन 4G/5G मोबाईल टॉवर लावले आहेत. हे टॉवर्स पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहेत. शिवाय, सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात बीएसएनएलला हजारो रुपयांचे आश्वासन दिले आहे. बीएसएनएल आपल्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी काम करत असून, या दूरसंचार कंपनीला सरकारी पाठिंबाही मिळणार आहे.






