

तुम्ही देखील Microsoft Edge युजर आहात का? प्रत्येक कासामाठी तुम्ही Microsoft Edge चा वापर करता का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण Microsoft Edge युजर्ससाठी सरकारने एक गंभीर इशारा जारी केला आहे. कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (Computer emergency response team) या सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या संस्थेला Microsoft Edge ब्राउझरमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. Microsoft Edge ब्राउझरच्या जुन्या वर्जनमध्ये या त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही Microsoft Edge ब्राउझरचे जुने वर्जन वापरत असाल, आत्ताच सावधाव व्हा. तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने म्हटलं आहे की, जे Microsoft Edge युजर्स Microsoft Edge चे126.0.2592.81 हे वर्जन किंवा त्यापूर्वीचे वर्जन वापरत असाल, तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. Microsoft Edge चे126.0.2592.81 आणि त्यापूर्वाीचे वर्जन सुरक्षित नाही. यामध्ये काही त्रुटी आढळल्या आगेत. खूप जुनं वर्जन वापरणाऱ्या युजर्सना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एक छोटीशी चूक देखील तुमचा वैयक्तिक डेटा लिक करू शकते. हॅकर्स तुमचा डेटा हॅक करू शकतात. ही समस्या त्या वापरकर्त्यांसाठी नाही जे मायक्रोसॉफ्ट एजची नवीन वर्जन वापरत आहेत. परंतु जे युजर्स खूप जुने वर्जन वापरत आहे, अशा युजर्सनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
Microsoft Edge युजर्सनी स्वत:चा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टींची खूप काळजी घेतली पाहिजे. सर्वात आधी तुम्ही ब्राउझरची नवीन वर्जन वापरत आहात याची खात्री करा. कुठूनही येणाऱ्या लिंकवर क्लिक करू नका. असे करणे धोकादायक ठरू शकते. कंपनीच्या नवीन अपडेटबद्दल माहिती मिळवा. कोणतेही नवीन अपडेट उपलब्ध असल्यास ते योग्य ठिकाणाहून डाऊनलोड करा.
यापूर्वी सरकारने Adobe युजर्सना धोक्याचा इशारा दिला होता. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने Adobe च्या 29 सॉफ्टवेअर आणि सेवांबाबत एक अलर्ट जारी केला होता. Adobe सारख्या अनेक सॉफ्टवेअरमध्ये गंभीर धोका असल्याचे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने सांगितलं होतं. यामध्ये Adobe Photoshop, ColdFusion आणि Creative Cloud सारख्या लोकप्रिय ॲप्सचा समावेश आहे.
इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने काही सॉफ्टवेअरची यादी प्रसिध्द केली, ज्यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्या.