अरे देवा!! ग्राहकांच्या बजेटवर पुन्हा ताण; Oppo आणि Xiaomi ने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती, नवीन दर पाहून बसेल धक्का
टिप्स्टर संजू चौधरीने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने डिव्हाईसच्या नवीन किंमतींबाबत माहिती शेअर केली आहे. एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, Oppo Find X9s च्या दोन्ही व्हेरिअंट्सच्या किंमतीत 5 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत यापूर्वी 79,999 रुपये होती. मात्र आता हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 84,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत आता 89,999 रुपयांऐवजी 94,999 रुपये झाली आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
शाओमी पॅड 8 च्या किंमतीत देखील वाढ करण्यात आली आहे. या डिव्हाईसचे 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना 43,999 रुपयांऐवजी 46,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर या डिव्हाईसच्या नॅनो टेक्सचर व्हेरिअंटची किंमत 45,999 रुपयांऐवजी आता 48,999 रुपये झाली आहे.
Price hike alert 🚨
OPPO & Xiaomi increases the price of smartphones & tablets by upto ₹5k: FIND X9s:
• 12/256GB: ₹79,999 → ₹84,999
• 12/512GB: ₹89,999 → ₹94,999 Pad 8
• 12/256GB: ₹43,999 → ₹46,999
• Nano texture : ₹45,999 → ₹48,999 Pad 2:
• 4/128GB… pic.twitter.com/FuNaPOB65X — Sanju Choudhary (@saaaanjjjuuu) September 1, 2026
रेडमी पॅड 2 चे 4GB रॅम + 128GB वायफाय व्हेरिअंट देखील आता 1 हजार रुपयांनी महाग झाले आहे. त्यामुळे आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 18,999 रुपयांऐवजी 19,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या डिव्हाईसच्या 4GB + 128GB सेलुलर मॉडेलची किंमत 19,999 रुपयांऐवजी 20,999 रुपये झाली आहे. तर 6GB + 128GB सेलुलर व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपयांऐवजी 23,999 रुपये झाली आहे. तर रेडमी पॅड 2 च्या 8GB रॅम + 256GB सेलुलर व्हेरिअंटच्या किंमतीत देखील 1 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 24,999 रुपयांऐवजी 25,999 रुपये मोजावे लागणार आहेत.
कंपनीने रेडमी 15 ए च्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत वाढ केली आहे. 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 15,999 रुपयांऐवजी 16,499 रुपये झाली आहे. तर 4GB + 128GB मॉडेलची किंमत 17,499 रुपयांऐवजी 18,499 रुपये झाली आहे. तर 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,499 रुपयांऐवजी 20,499 रुपये झाली आहे. कंपनीने अद्याप अधिकृतपणे या बदलत्या किंमतींची माहिती थेट शेअर केली नाही. मात्र ओप्पो आणि शाओमीच्या भारतीय वेबसाईट्सवर या नवीन किंमती पाहायला मिळत आहेत.






