Tech Tips: कोण वापरतंय तुमच्या iPhone चा हॉटस्पॉट डेटा? क्षणार्धात लावा शोध, फॉलो करा ही सोपी प्रोसेस
अॅपलमध्ये आधीपासूनच अशी एक सेटिंग होती ज्यामध्ये यूजर्सना ही माहिती मिळवू शकत होते की त्यांच्या हॉटस्पॉट डेटाचा वापर कोण करत आहे. मात्र ही सेटिंग एका सेल्युलर सेटिंगमध्ये लपलेली होती. ज्यामुळे अधिक युजर्सना याबाबत माहिती नव्हते. मात्र आता नव्या अपडेटनंतर पर्सनल हॉटस्पॉट मेन्यूमध्ये दिसणार आहे. यामुळे युजर्सना या सेटिंगवर नजर ठेवणे अधिक सोपे होणार आहे. ही सेटिंग वापरण्यासाठी आयफोन अपडेट करणे गरजेचे आहे. iOS 26.4 अपडेटमध्ये हा बदल करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सर्वात आधी आयफोन सेटिंग ओपन करा आणि पर्सनल हॉटस्पॉटवर टॅप करा. मैक्सिमाइज कंपेटिबिलिटी टॉगलच्या खालच्या बाजूला असलेल्या डेटा यूसेज ऑप्शनवर टॅप करा. इथे आयफोनचा हॉटस्पॉट डेटा कनेक्ट केलेल्या सर्व डिव्हाईसची यादी तुम्हाला दिसणार आहे. तसेच कोणत्या डिव्हाईसने किती डेटाचा वापर केला आहे, याबाबत देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला ॲपलची डिव्हाईस नावाप्रमाणे दिसतील, तर अँड्रॉइड आणि विंडोज पीसी इत्यादी ‘इतर डिव्हाईस’ या गटामध्ये दिसतील.
जर तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क आहे. मात्र हॉटस्पॉटमुळे इंटरनेट स्पीड अतिशय कमी झाली असेल तर तुम्हाला सेटिंगमध्ये काही बदल करण्याची गरज भासणार आहे. सहसा अनेक स्मार्टफोन बाय डिफॉल्ट 2.4GHz बँडवर वायफाय हॉटस्पॉट क्रिएट करतात. हा बँड जुन्या डिव्हाईससाठी देखील सुसंगत आहे आणि त्याची रेंज जास्त आहे, परंतु तो वेगाच्या बाबतीत मागे आहे. त्यामुळे, तो बदलणे आवश्यक आहे.
iCloud स्कॅमने उडवली iPhone यूजर्सची झोप! अशी होतेय फसवणूक, सावध राहण्यासाठी वाचा एक्सपर्टचा सल्ला
जर तुम्हाला हॉटस्पॉटवर फास्ट इंटरनेट पाहिजे असेल तर 2.4GHz बँड बदलून 5GHz वर सेट करा. हे हायर डेटा ट्रांसफर रेटला सपोर्ट करतात. आधुनिक स्मार्टफोन्सवर, तुम्हाला हा पर्याय तुमच्या हॉटस्पॉट किंवा टेथरिंग सेटिंग्जमध्ये मिळेल. एकदा सक्षम केल्यावर, तुम्हाला अधिक वेगवान इंटरनेट आणि कमी विलंब मिळेल.






