Published Dece 22, 2024
By Chetan Bodke
Pic Credit- Instagram
‘रेड सी फिल्म फेस्टिव्हल’ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील अभिनेत्री श्रद्धा कपूरचा खास लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
‘रेड सी फिल्म फेस्टिव्हल’मध्ये फक्त हॉलिवूड सेलिब्रिटींनीच नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
त्यापैकी एक म्हणजे श्रद्धा कपूर होय, श्रद्धाने आपल्या सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
‘रेड सी फिल्म फेस्टिव्हल’साठी श्रद्धाने मल्टी कलरचा समावेश असलेला गाऊन परिधान केला आहे.
या गाऊनच्या एका बाजूने निळ्या रंगाचे कापड असून श्रद्धाने जवळपास एकही दागिना वेअर केलेला नाही.
श्रद्धाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं नैसर्गिक सौंदर्य फुलून आले आहे.
.
पोस्टला श्रद्धाने ‘2025 ki Resolutions toh aise soch rahe ho jaise 2024 ki poori kar li’ असं कॅप्शन दिलं आहे.
.