Royal Enfield चे चाहते आहात का? जाणून घ्या, भारतात बंड घडवणाऱ्या या ३ बाईक्स

Royal Enfield ची क्लासिक 350 मोटरसायकल लोकांमध्ये भरपूर प्रसिद्ध आहे. त्यामुळेच, कंपनीने आपल्या चाहत्यांसाठी आणखी काही नवीन मोटरसायकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. या नवीन मोटरसायकल 350cc, 350cc आणि 650cc सेगमेंटमध्ये चाहत्यांना उपलब्ध होऊ शकतात.
royal enfied (2)
Published on: 
Updated on: 

Royal Enfield ही नेहमीच भारतातील लोकांची पहिली पसंती ठरली आहे. रॉयल एनफिल्डच्या मोटारसायकल विशेषत: पर्वतांमध्ये फिरण्याची आवड असलेल्या लोकांना आवडते. काही लोक स्वतःची बाईक विकत घेतात तर काही भाड्याने घेऊन डोंगरात फिरायला जातात. रॉयल एनफिल्डची क्लासिक 350 मोटरसायकल लोकांमध्ये खूप लोकप्रिय होताना दिसत आहे. बहुतेकांना ही बाईक खरेदी करायला आवडते. ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारसायकलींपैकी एक मानली जाते. तसेच नवीन लाँच होणाऱ्या मोटरसायकल या 2024 च्या शेवटी बाजारात प्रसिद्ध होऊ शकतात.

1. गुरिल्ला 450

Royal Enfield एक नवीन मोटरसायकल बाजारात आणण्याच्या विचारात आहे, ज्याचे नाव Guerrilla 450 असे आहे. ही बाईक 2024मध्ये किंवा 2025 च्या सुरुवातीला लाँच केली जाण्याची शक्यता आहे. ट्रायम्फ स्पीड 400 सारख्या बाइकला स्पर्धक म्हणून लाँच केले जाऊ शकते. Royal Enfield Guerrilla 450 मध्ये 17 इंची अलॉय व्हील्स मिळणार आहे.

Royal Enfield Bullet 350 2024 Images - Check out design & styling | OTO

2. क्लासिक 650 ट्विन

Royal Enfield च्या या Classic 650 ट्विनमध्ये 648cc समांतर ट्विन इंजिन आढळू शकतात. परंतु, हे इंजिन 47bhp च्या कमाल पॉवरवर 52Nm टॉर्क जनरेट करणार आहे. ही मोटरसायकल Interceptor 650 आणि Super Meteor 650 मध्ये ठेवता येऊ शकते.

3. बुलेट 650

याचदरम्यान, कंपनीने बाजारात आणण्याच्या तयारीत असलेल्या तिसऱ्या मोटरसायकलचे नाव Royal Enfield Bullet 650 आहे. लोकांना रॉयल एनफील्ड बुलेट 350 खूप आवडली आहे. आणि या मोटरसायकलची मार्केटमध्ये चांगली विक्री झाली आहे. हे लक्षात घेऊनच कंपनी आता बुलेट 650 लाँच करण्याच्या तयारीत आहे. या आगामी मोटरसायकलमध्ये 648cc समांतर ट्विन इंजिन मिळणार आहे. हे इंजिन 47bhp च्या पॉवरवर 52Nm टॉर्क जनरेट करेल.