Honda ने अवघ्या एका वर्षात विकले या बाईकचे 3 लाख युनिट्स, बाजारात दाखल '100' पॉवर मायलेज

Honda ने गेल्या वर्षी भारतीय बाजारात 100cc इंजिनसह Shine 100 लाँच केले. आता एका वर्षात या बाईकच्या 3 लाख युनिट्सची विक्री झाल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
homda shine 100
Published on: 
Updated on: 

हिरो मोटोकॉर्पची भारतीय बाजारपेठेत कम्युटर सेगमेंट बाईक विकण्यात कोणतीही स्पर्धा नाही आहे. तथापि, या सेगमेंटमध्ये, Honda देखील Hero MotoCorp ला त्यांच्या प्रवासी बाइक्सच्या लाइनअपच्या आधारावर स्पर्धा देणार आहे. Honda ने गेल्या वर्षी भारतीय बाजारात 100cc इंजिनसह Shine 100 लाँच केले. आता एका वर्षात या बाईकच्या 3 लाख युनिट्सची विक्री झाल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. Honda Shine 100 थेट Hero Splendor Plus आणि HF Deluxe शी स्पर्धा करणार आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की, गेल्या आर्थिक वर्षात 100-110cc सेगमेंटमधील बाइकच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या, कंपनी देशभरात 6,000 हून अधिक टचपॉइंट्स कार्यरत करत आहे. जिथे सर्व प्रकारच्या Honda बाइक्ससाठी सेवा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. शाइन 100 वर्धापन दिन साजरा करण्यासाठी होंडाने अनेक शहरांमध्ये मेगा डिलिव्हरी इव्हेंट्सचे आयोजन सुद्धा केले होते.

होंडाची Shine 100 कशी आहे?

Shine 100 बद्दल बोलायचे झाले तर, यात 100cc सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन आहे. चांगल्या मायलेजसाठी या बाईकमध्ये इंधन इंजेक्शन आणि Honda eSP तंत्रज्ञान आहे. याशिवाय, इंजिनला अपडेट केलेल्या BS6 RDE नियमांनुसार डिझाइन केली आहे. या बाईकमधील इंधन पंप टाकीच्या बाहेर आहे आणि तो ऑटो चोक सिस्टमसह येतो. ही बाईक 7.5 BHP पॉवर आणि 8.5 Nm टॉर्क जनरेट करते.

बाइकवर अप्रतिम वॉरंटी

कंपनी या बाईकसह ग्राहकांना 6 वर्षांची आकर्षक वॉरंटी देत ​​आहे. यामध्ये 3 वर्षांच्या स्टँडर्ड वॉरंटीसह 3 वर्षांच्या विस्तारित वॉरंटीचा समावेश आहे. या बाईकच्या काही मानक वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर, त्यात काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत जसे की ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कॉम्बी ब्रेक सिस्टम (सीबीएस), इक्वलायझर, साइड स्टँड इंजिन कटऑफ स्विच हे उपलब्ध करू दिले आहे. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 65 kmpl चा मायलेज सहज मिळेल. तसेच कंपनीने Shine 100 ची किंमत 65,011 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे.