

टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीने आर्थिक वर्ष २४ मध्ये ग्रामीण क्षेत्रांतील विक्रीत प्रभावी कामगिरी केली, जेथे कंपनीच्या एकूण पॅसेंजर वेईकल्स विक्रीत ४० टक्क्यांचे योगदान दिले. टाटा मोटर्सच्या कार्स व एसयूव्हींच्या न्यू फॉरेव्हर श्रेणीची लोकप्रियता ग्रामीण ग्राहकांमध्ये देखील वाढली आहे, ज्यामध्ये ७० टक्के ग्राहक पहिल्यांदाच कार खरेदीदार आहेत. वाढत्या पायाभूत सुविधा, डिजिटल उपलब्धता आणि खरेदी क्षमतेसह ग्रामीण व शहरी ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांमधील तफावत कमी होत आहे.
विभागीय परिवर्तन
टाटा मोटर्सच्या कार्स व एसयूव्हींच्या न्यू फॉरेव्हर श्रेणीने विशेषत: ग्रामीण ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या श्रेणीमध्ये भावी डिझाइन, उत्साहवर्धक कार्यक्षमता आणि अनेक प्रगत तंत्रज्ञान व सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत. टाटा मोटर्स भारतातील ग्रामीण भागांमधील यशाचे श्रेय त्यांची नाविन्यपूर्ण वेईकल्स आणि ग्रामीण ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या गरजांबाबत असलेल्या माहितीला जाते. ग्रामीण बाजारपेठांच्या व्यापक क्षमता आणि ग्रामीण बाजारपेठा प्रदान करणाऱ्या संधींचा फायदा घेत टाटा मोटर्सचा आपले स्थान दृढ करण्याचा, तसेच बाजारपेठेतील उपस्थिती वाढवण्याचा मनसुबा आहे.