

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या 2022-23 अर्थसंल्पात कर, रेल्वे, आरोग्य, पायाभूत सुविधा, कृषी, उद्योग, क्रीडा आणि इतरही क्षेत्रात भरीव तरतूद करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
आत्मनिर्भरताला चालना देण्यासाठी आणि संरक्षण उपकरणांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी संरक्षणासाठी भांडवली खरेदी बजेटच्या 68% रक्कम देशांतर्गत उद्योगासाठी राखून ठेवली जाईल. हे गेल्या आर्थिक वर्षाच्या 58% पेक्षा जास्त आहे, अशी घोषणा सीतारमन यांनी केली. संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी 25 टक्के बजेटची तरतूद सरकारकडून केली जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. सीमांवर अतिरिक्त परिस्थिती असल्याने या अर्थसंकल्पात संरक्षणावर अधिक लक्ष दिले जात आहे.