Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणत्या स्टॉक्सवर तज्ज्ञांचे लक्ष? जाणून घ्या सविस्तर
भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार आजच्या व्यवहारात इन्फोसिस, अदानी पॉवर, श्रीराम फायनान्स , टाटा मोटर्स, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन , कोफोर्ज, स्विगी, आयटी सेवा कंपनी सायंट, ईमुद्रा, अदानी एनर्जी सोल्युशन्स, कोलगेट-पामोलिव्ह इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी टोटल गॅस, ब्लूस्टोन ज्वेलरी अँड लाइफस्टाइल, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल), क्रेडिटॲक्सेस ग्रामीण या स्टॉक्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. (फोटो सौजन्य: istock)
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख, चंदन तापारिया यांनी गुंतवणूकदारांना दोन स्टॉक्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. चंदन तापारिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये फेडरल बँक आणि इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स समाविष्ट आहेत.
भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी साउथ इंडियन बँक लि., लीला पॅलेसेस हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स लि., ऑइल इंडिया लि., टॅनला प्लॅटफॉर्म्स लि., इंडियन हॉटेल्स कंपनी लि., या शेअर्सची निवड केली आहे.






