Stock Market Today: शेअर बाजार आज कसा उघडणार? तज्ज्ञांकडून खरेदीसाठी 'या' स्टॉक्सची शिफारस
Todays Gold-Silver Price: आज सोनं महाग की स्वस्त? एका क्लिकवर जाणून घ्या आजचे दर
गुरुवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स १२२.५६ अंकांनी, म्हणजेच ०.१६ टक्क्यांनी घसरून ७७,९८८.६८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३४.५५ अंकांनी, म्हणजेच ०.१४ टक्क्यांनी घसरून २४,१९६.७५ वर स्थिरावला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक २१५.५५ अंकांनी, म्हणजेच ०.३८ टक्क्यांनी घसरून ५६,०८६.४० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
रेलिगेअर ब्रोकिंगचे संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी पुढील १ ते २ आठवड्यांसाठी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी 3 शेअर्सची शिफारस केली आहे. अजित मिश्रा यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार अल्प मुदतीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल), पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) हे शेअर्स खरेदी करू शकतात. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंट, डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया यांनी आज, १७ एप्रिल २०२६ रोजी गुंतवणूकदारांना खरेदीसाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. तापारिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार इटरनल , क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स आणि पीबी फिनटेकचे शेअर्स खरेदी करू शकतात.
निओट्रेडर आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे सह-संस्थापक राजा व्यंकटरमण यांनी गुंतवणूकदारांना ट्रेड करण्यासाठी अॅस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि एचईजी लिमिटेड यांची शिफारस केली आहे. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खरेदी किंवा विक्री करण्याकरिता तीन इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये एमजीएल, एनसीसी आणि एसजेव्हीएन यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज शेअर बाजारातील गुंतवणूकदार निओजेन केमिकल्स, अॅस्ट्रा मायक्रोवेव्ह, सेनोरेस फार्मास्युटिकल्स, अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स आणि आयएफसीआय या पाच शेअर्सची खरेदी करण्याचा विचार करू शकतात.






