आता UPI Transactions वर लागणार चार्ज? ( सौजन्य - सोशल मीडिया )
MDR हे डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांवर आकारले जाणारे शुल्क आहे. पण, या शुल्काचा अर्थ असा नाही की ग्राहकांना प्रत्येक UPI पेमेंटसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. चला, गूगल पे, फोनपे आणि पेटीएमच्या वापरकर्त्यांवर याचे काय परिणाम होतील ते पाहूया.
या नवीन प्रणालीमध्ये Google Pay, PhonePe आणि Paytm सारख्या ॲप्सद्वारे केलेल्या UPI पेमेंटसाठी ग्राहकांकडून थेट प्लॅटफॉर्म शुल्काचा समावेश नाही. अहवालानुसार, १५ ऑक्टोबरपासून, ₹२,००० पेक्षा जास्त रकमेच्या काही विशिष्ट व्यापारी UPI व्यवहारांवर ०.४% MDR मटेरियल डिस्काउंट रेट लागू होईल, पण सणासुदीच्या कालावधीमुळे आणि व्यापारी संघटनांच्या विनंतीनुसार, हे शुल्क १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याचा प्रस्ताव NPCI आणि सरकारच्या विचाराधीन आहे. याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. पण लागू होणारा MDR ज्याची कमाल मर्यादा ₹३०० असेल. हे शुल्क व्यापाऱ्याला भरावे लागेल. याअंतर्गत, ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याची परवानगी दिली जाणार नाही.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI च्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमधील २,४५० कोटी व्यवहारांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये UPI द्वारे एकूण २,४०७ कोटी व्यवहार झाले. ही सुमारे १.८% ची घट दर्शवते. ऑगस्टमधील UPI व्यवहारांचे एकूण मूल्य ₹२९.८२ लाख कोटी होते. पण सप्टेंबरमध्ये ते २९.३७ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले, म्हणजेच एकूण व्यवहार मूल्यात अंदाजे १.५% घट झाली. तथापि, उद्योग तज्ज्ञांनी याचे कारण ऑगस्ट महिन्यातील ३१ दिवसांचा आणि सप्टेंबर महिन्यातील ३० दिवसांचा कालावधी असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, सरासरी दैनंदिन व्यवहारांच्या संख्येत घट झाली नाही.
RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या मते, एमडीआरच्या स्वरूपात नाममात्र शुल्क लागू केल्याने यूपीआय व्यवहारांच्या संख्येवर लक्षणीय परिणाम होण्याची अपेक्षा नाही. त्यांनी सांगितले की, सध्या व्यवहारांच्या संख्येत लक्षणीय घट होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.
Dhruv Rathee Net Worth : युट्यूबर ध्रुव राठीकडे किती कोटींची मालमत्ता? कुठून होते सर्वाधिक कमाई?






